आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MIM Get 25 To 30 Seats In Upcoming Solapur Election

दिव्य मराठी विशेष : ‘एमआयएम’ औरंगाबादचा कित्ता येथेही गिरवू शकेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - औरंगाबाद महापालिका निवडणुकीत मजलिस इत्तेहाद उल मुस्लिमीन (एमआयएम)पक्षाने राजकीय विश्लेषकांचे अंदाज खोटे ठरवत ११३पैकी २५ जागांवर विजय मिळवला. त्याचा फटका थेट काँग्रेसला बसला आणि १० जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ जागा मिळाल्या. मुस्लिम आणि बहुजन समाज अशा सामाजिक अभियांत्रिकीचे सूत्र एमआयएमने राबवले. सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत या सूत्राने एमआयएमला किमान २५ ते ३० जागा मिळू शकतात.

मुस्लिम-बहुजन सूत्राचा सर्वांत अधिक फटका काँग्रेसला बसलेला दिसून आला. सोलापुरात सध्या महापालिकेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. सभागृहात सध्या मुस्लिम समाजाचे १२ तर मागासवर्गीय आणि राखीव गटातून निवडून आलेले ३२ नगरसेवक आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेले चार मुस्लिम उमेदवार पराभूत झाले. ही सगळी संख्या मिळून ४८ पर्यंत जाते. या सर्व जागांवर एमआयएमचा विजय होईल, अशी कल्पना करणे योग्य होणार नाही.
मात्र, यापैकी २५पेक्षा जास्त जागांवर त्यांचा कब्जा होऊ शकतो. १९९७मध्ये मुस्लिम समाजातील १६, २००२ मध्ये १५ तर २००७ मध्ये १४ नगरसेवक निवडून आले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहरात एमआयएमने तीन उमेदवार उभे केले होते. त्यांना मिळालेली मते लक्षणीय आहेत.

मतदारांना जागृत करू

एमआयएम हा तरुण वर्गाला आमिष दाखवून त्यांची गैरसमज करून त्यांना आकर्षित करून घेत आहे. यामुळे धर्मनिरपेक्ष मतांवर परिणाम होत आहे. औरंगाबादमध्ये जसे एमआयएमला यश मिळाले तसे सोलापुरात होणार नाही. आम्ही सर्व मतदारांना जागृत करू.” अॅड.यू. एन. बेरिया, ज्येष्ठ नगरसेवक

... तो तर जातीयवादी पक्ष
एमआयएम हा जातीयवादी पक्ष असून काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. जातीयवादी पक्षासमोर धर्मनिरपेक्ष पक्षाची ताकद कमी पडली. आमच्यासाठी हा चिंतनाचा विषय आहे. दोन्ही पक्षांची ओळख मतदारांना पटवून देण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे. औरंगाबादप्रमाणे सोलापूरला होऊ देणार नाही.” प्रकाशयलगुलवार, शहराध्यक्ष, कॉँग्रेस

विकासाच्या मुद्द्यावर विजय

‘एमआयएम’ने औरंगाबादमध्ये विकासाच्या मुद्यावर २५ जागा निवडून आणल्या. कॉँग्रेसने मुस्लिमांसाठी काहीही केले नाही. भाजपा-सेना युतीही करत नाही. बहुजन समाजावर अनेक ठिकाणी अत्याचार होत आहेत. त्यातील आरोपींना अटक केली जात नाही. मुस्लिम बहुजन समाजाने एकत्र येऊन ताकद दाखवून दिली आहे. सोलापुरात येत्या निवडणुकीत जास्तीत जास्त जागांवर निवडणूक लढवू.” तौफिकशेख, शहराध्यक्ष, एमआयएम