आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनहिताचा फॉर्म्युला येथेही राबवणार - इम्तियाज जलिल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - धर्मनिरपेक्षतेच्या नावाने मतदारांना भूलथापा देणार्‍यांचे औरंगाबादेत आम्ही बिंग फोडले. गेल्या ३० वर्षांत शहराचा, परिसराचा किती विकास झाला? शिक्षण, उद्योग क्षेत्रासोबत सामाजिक स्तर का उंचावला गेला नाही? अशा प्रश्नांवर मतदार जागृतीचा ‘पॉलिटिकल अजेंडा’ ‘एमआयएम’ने लोकांपर्यंत पोहोचवला. हाच कित्ता सोलापुरात गिरवला जाईल, असे आमदार इम्तियाज जलिल (औरंगाबाद) यांनी सांगितले.

सोलापुरातील ‘एमआयएम’च्या मेळावा निमित्त श्री. जलिल मंगळवारी सोलापुरात आले होते. यावेळी दिव्य मराठीने संवाद साधला. ते म्हणाले, ‘एमआयएम हा मुस्लिमांचा पक्ष असल्याचे सांगून बदनाम केले जाते. हैदराबादमध्ये आम्ही मागासवर्गीय नेत्याला महापौर बनवले. औरंगाबाद महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या २६ नगरसेवकांपैकी मागासवर्गातील हिंदू आहे. मुस्लिमबहुल भागातून हिंदू भगिनी निवडून आली, हे आमचे सोशल इंजिनिअरिंग आहे.
चारित्र्यआणि सुशिक्षित उमेदवार : महापालिकाअसो किंवा विधानसभा-लोकसभा निवडणूक. स्वच्छ चारित्र आणि सुशिक्षित व्यक्तीला एमआयएमकडून उमेदवारी मिळेल. आमच्याकडे उच्च शिक्षितांचा ओढा जास्त आहे. औरंगाबादमध्ये १४ महिला उमेदवार निवडून आणल्या आहेत.

आश्वासने पूर्ण करू : विधानसभानिवडणुकीवेळी एमआयएमने दिलेली आश्वासने पूर्ण होतील. मालेगावमध्ये हॉस्पिटलचे काम सुरू झाले आहे. औरंगाबादमध्ये जागा घेत आहोत. नांदेडमध्ये पहिल्यापासून आरोग्य सेवा सुरू आहे. सोलापूरमध्ये वर्षभरात हॉस्पिटलच्या कामाला सुरुवात होईल.

पक्ष संघटन बांधणी महत्त्वाची
निवडूनआल्यावर आम्हाला सत्ता मिळाली नाही. एमआयएमचा सर्वाधिक फटका कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसला आहे. भाजप-सेना युतीला फायदा झाल्याचा आमच्यावरचा आरोप बिनबुडाचा आहे. एमआयएममुळे कोणाला फायदा झाला की तोटा यापेक्षा आम्ही प्लसमध्ये आहोत. पक्ष संघटन बांधणीवर आमचे लक्ष केंद्रित आहे.

सत्तेपेक्षा एकसंधतेला महत्त्व
कॉँग्रेस,राष्ट्रवादी, भाजप-सेनेने मुस्लिम आणि मागास घटकाला केवळ ‘मतदार’ म्हणूनच पाहिले. आम्ही लोकजागृती केली. लोकांना प्रस्थापित पक्षांचे राजकीय षडयंत्र समजल्याने एमआयएमला मतदार कौल देत आहेत. आम्ही सत्ता साधन मानत नाही. सर्वसमावेशक हिताचे राजकारण विकास हा आमचा अजेंडा आहे. नडलेल्या सर्व वर्गाला एका प्लाटफाॅर्मवर आणून एकसंधतेची ताकद आम्ही दाखवत आहोत. औरंगाबादच्या निकालाने सर्वच राजकीय पक्षांचा फाजील आत्मविश्वास गळाला असल्याचे त्यांनी सांगितले.