आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एमआयएमची आज पहिली जाहीर सभा, होम मैदान परिसरात वाहतूक मार्गात बदल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- विधानसभा निवडणुकीला आता रंग चढू लागला असून प्रचाराची पहिली सभा घेण्याचा मान एमआयएमने पटकावला आहे. शहरातील होम मैदानावर सोमवारी सायंकाळी होणाऱ्या सभेत पक्षाचे आमदार अकबर ओवेसी मार्गदर्शन करणार आहेत.ओवेसी यांची सोलापुरातील ही पहिलीच सभा आहे, असे शहराध्यक्ष शकील शेख यांनी सांगितले.
रविवारी सायंकाळी होम मैदानावर सभेसाठी भव्य सभामंडप उभारण्याचे काम सुरू होते. व्यासपीठापासून ४५ यार्डचा डी झोन तयार करण्यात आला आहे. उपस्थितांसाठी खुर्च्यांची सोय करण्यात आली आहे. तसेच व्यासपीठाच्या उजव्या आणि डाव्या बाजूस मोठ्या स्क्रिनची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांकडून सभेच्या ठिकाणीची पाहणी करण्यात आली. उद्या होणाऱ्या सभेसाठी सोलापूरसह लातूर, उस्मानाबाद, नांदेड, औरंगाबाद, विजापूर, गुलबर्गा आदी ठिकाणाहून कार्यकर्ते येणार आहेत.
ओवेसी पुणे येथून कारने दुपारी दोन वाजता येणार असून बाळे येथे त्यांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली आहे. सभेनंतर ते हैदराबादला रवाना होतील. सभास्थळी साहायक आयुक्त, निरीक्षक, फौजदार दर्जाचे २३ अधिकारी, १५० कर्मचारी असा ताफा बंदोबस्तासाठी राहील अशी माहिती पोलिससूत्रांनी दिली. होम मैदानावर होणाऱ्या एमआयएम पक्षाच्या सभेची जय्यत तयारी सुरू होती.
होम मैदानावर सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमाराला जाहीर सभा असल्यामुळे सायंकाळी पाचपासून रंगभवन ते डफरीन आणि पार्क चौक ते लक्ष्मी मार्केट पोलिस चौकी हा मार्ग वाहतुकीसाठी काही काळ बंद राहील. सभा संपल्यानंतर काही वेळातच पुन्हा वाहतूक सुरळीत सुरू होईल असे वाहतूक शाखेतर्फे सांगण्यात आले.