आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mirajj Pandharpur Fast Passenger Starts Fron 24 Th April 2015

मिरज-पंढरपूर फास्ट पॅसेंजर २४ एप्रिलपासून धावणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - उन्हाळ्यात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मिरज-पंढरपूर फास्ट पॅसेंजर गाडी (गाडी क्र-०१४२७/२८) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. २४ एप्रिल ते २१ जूनदरम्यान आठवड्यातील शुक्रवार, शनिवार रविवार असे तीन दिवस ही गाडी धावणार आहे.
पंढरपूर-मिरज पॅसेंजर पंढरपूर येथून सकाळी १० वाजता सुटेल. मिरजला दुपारी वाजून ३० मिनिटांनी पाेहोचेल. पुन्हा हीच गाडी मिरज येथून दुपारी वाजून ४० मिनिटांनी निघून पंढरपूरला सायंकाळी वाजून २५ मिनिटांनी पोहोचेल. या गाडीला अरग, सलगरे, कवठेमहांकाळ, ढालगाव, जतरोड, सांगोला आदी प्रमुख स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
गाडीस शयनयान सर्वसाधारण डबे जोडण्यात आले आहेत. प्रवाशांनी या गाडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक के. व्ही. थॉमस यांनी केले आहे.