आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Miss Solapur News In Marathi, Miss Solapur Competition Issue At Solapur, Divya Marathi

इंडियन मॉडेल स्कूलमध्ये ‘मिसेस सोलापूर’ स्पध्रेचे अवतरल्या 170 लावण्यवती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - कुणी जिजाऊच्या रूपात, कुणी बंगाली माधुर्य लेवून तर कुणी चुणचुणीत मराठमोळ्या सौंदर्यात. नखशिखांत नटलेल्या 170 लावण्यवती रविवारी इंडियन मॉडेल स्कूलच्या प्रांगणात अवतरल्या. निमित्त होते र्शी साई महिला प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या एकल नृत्य अन् मिसेस सोलापूर स्पर्धेचे. सचिव सायली जोशी आणि परीक्षक अंकिता सिंग यांनी उद्घाटन केले. वेशभूषा, ओळख परेड कॅट वॉक, बेस्ट फेस बेस्ट हेअर आणि बेस्ट हेअर स्टाइल अशा चाचण्या मिसेस सोलापूर स्पर्धेच्या वेळी घेतल्या गेल्या.
एकल नृत्याच्या स्पर्धेत 85 महिलांनी केली धमाल
इंडियन मॉडेल स्कूल येथे सकाळच्या सत्रात एकल नृत्याच्या स्पध्रेत 85 महिला सहभागी झाल्या. विविध गीतांवर महिलांनी पदलालित्य सादर केले. रामलीला, महाराष्ट्रीयन गीते, भरतनाट्यम आणि कथकच्या पारंपरिक व फ्युजनची सांगड घालून कलाविष्कार सादर झाले.