आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिशन अॅडमिशन: पहिल्याच दिवशी पालकांची तारांबळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी विष्णू कांबळे यांनी नर्सरी पहिलीची प्रवेश प्रक्रिया एप्रिलपासून राबविण्याचे आदेश दिले होते. मात्र, आदेशाचे परिपत्रक उशिरा मिळाल्याने एप्रिलपासून प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा एकतर्फी निर्णय ‘मेस्टा’ने (महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन) घेतला. या दोघांच्या वादात सोमवारी मात्र पालकांची तारांबळ उडाली. मराठी माध्यमांच्या काही शाळांतून प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली. तर इंग्रजी माध्यमांनी बुधवारपासून प्रवेश प्रक्रिया राबविणार असण्याचे सांगितले. दरम्यान, प्रवेशासाठी आलेल्या पालकांना निराश होऊन परतावे लागले. आता एप्रिलपासून प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

शहरातील मराठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी एप्रिलपासून प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या सूचना प्रशासनाधिकारी विष्णू कांबळे यांनी दिल्या होत्या. दरम्यान उशिरा मिळालेले परिपत्रक शिक्षण मंडळाच्या काही नियम अटीवर आक्षेप घेत प्रामुख्यांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी प्रवेश प्रक्रिया राबविलीच नाही. यामध्ये ‘मेस्टा’चा पुढाकार होता. प्रवेश प्रक्रियेवरून निर्माण झालेल्या वादावर मार्ग काढण्यासाठी सोमवारी सकाळी प्रशासनाधिकारी कांबळे आणि मेस्टाचे पदाधिकारी यांची बैठक झाली. यावेळी बैठकीतील चर्चेत प्रशासनाकडून मेस्टाच्या काही अटी मान्य करण्यात आल्या. तर काही अमान्य करण्यात आल्या. बैठकीस प्रशासनाच्या प्रभावती कस्सा बुलबुले यांच्यासह मेस्टा संघटनेचे अध्यक्ष अजय पोन्नम, अमोल जोशी, सिस्टर थेलमा यांच्यासह १६ शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

इंग्रजी शाळांचा मुजोरपणा
इंग्रजी शाळांचा हा मुजोरपणा आहे. प्रवेश अर्ज विचारला गेल्यास चांगली वागणूक देत नाहीत. प्रवेश अर्ज मिळणार नाही, अशा पध्दतीची भाषा देतात. त्यावर प्रशासनाने अंकुश लावण्याची गरज आहे. संतोषचवरे, पालक

किमीचा नियम बंधनकारक
आरटीई२००९ अॅक्टनुसार शाळेपासून किमीच्या परिसरात राहणा-या बालकांना प्रवेश देणे बंधनकारक आहे. इंग्रजी शाळा हा नियम पाळत नाहीत. प्रवेश अर्जाला रुपये इतका खर्च असताना ५० रुपये घेतात हे चुकीचे आहे. शामवाघमारे, आरटीई कार्यकर्ता

प्रवेश अर्ज मोफत देण्याचे मराठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना आदेश आहेत. सोमवारपासून मराठी माध्यमांच्या शाळांनी प्रवेश प्रक्रिया सुरू केली. मोफत प्रवेश अर्ज देण्यात येत आहेत. मात्र इंग्रजी माध्यमाच्या शाळा अर्ज मोफत देण्यास नकार देत आहेत. इंग्रजी शाळा मात्र मेस्टा संघटनेच्या माध्यमातून प्रवेश देण्यात अटी निर्बंध लादत आहेत.

नियमबाह्य अटी
प्रशासनाधिकारी नियमबाह्य अटी लादत आहेत. याबाबत मंगळवारी शिक्षणाधिकारी राजेंद्र बाबर यांच्याकडे तक्रार करणार आहे. मागण्या मान्य नाही झाल्यास प्रवेश प्रक्रिया बंद करू. प्रत्येक प्रवेश अर्जासाठी ५० रुपये शुल्क आकारण्याच्या निर्णयावर संघटना ठाम आहे. विजयपोन्नम, अध्यक्ष, मेस्टा संघटना

या मागण्या मान्य
>प्रवेशबुधवारपासून सुरू करणार
>प्रवेशाचे रजिस्टर प्रशासनाधिकारी यांच्याकडून प्रमाणित करून घेणार
>रजिस्टर नोंदी तारखानिहाय ठेवून दैनदिन अहवाल शिक्षण विभागाला दररोज सादर करणार

यामागण्या अमान्य
>१किलोमीटरची अट शिथील करावी
>प्रवेश मिळालेले मिळालेले यांची यादी जाहीर करावी
>प्रवेश अर्ज शुल्क ५० रुपये आकारणे, माेफत नको, अशी इंग्रजी माध्यमांची मागणी
मेस्टा संघटनेचे पदाधिकारी इंग्रजी शाळांच्या प्रतिनिधीसमवेत झालेल्या बैठकीत प्रशासनाधिकारी विष्णू कांबळे यांनी मार्गदर्शन केले.

सम्राट चौकातील महेश स्कूलमध्ये प्रवेशासाठी पालकांच्या रांगा होत्या.