आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषदेजवळचा रस्ता होणार आता मोकळा, याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जिल्हा परिषदे लगतच्या काँग्रेस भवनाच्या समोरील बाजूकडील रस्त्यालगतच्या खोकीधारकांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही. ए. नाईक सी. व्ही. भडंगे यांनी गुरुवारी (दि. १२) फेटाळली. त्यानंतर तातडीने महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने अतिक्रमण करून थाटलेली ही खोकी हटवण्याची मोहीम सुरू केली. दरम्यान, खोकीधारकांनी दोन िदवसांची मुदत मागितली. ती महापालिका प्रशासनाने िदली. त्यानंतर ही खोकी काढण्यात येणार असल्याने आता हा रस्ता मोकळा होणार आहे.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत सात रस्ता ते रूपाभवानी मंदिर रस्त्याचे रुंदीकरण होणार आहे. हा रस्ता १८ मीटरचा करण्यात येणार आहे. त्या कामाला िजल्हा परिषदेच्या संरक्षक िभंतीलगत झालेल्या खोकीधारकांच्या या अतिक्रमणामुळे अडथळा येत होता. त्यामुळे या कामासाठी महापालिकेने खोकीधारकांना नोटिसा िदल्या होत्या. त्यावेळी खोकीधारकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुजाहिद शब्बीर पिरजादे यांच्यासह काहीनी ही याचिका दाखल केली होती. ती याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. यात मनपाच्या वतीने अॅड. राजकुमार आळंगे तर याचिकाकर्ते खोकीधारकांच्या वतीने विवेकानंद तडके यांनी काम पाहिले.
महापालिकेच्या पथकाने तीन खोके जेसीबीने काढून टाकले. त्यावेळी इतर खोकीधारक आतील साहित्य स्वत:हून काढून घेऊ लागले होते. अचानक सुरू झालेल्या या कारवाईने त्यांची धावपळ सुरू झाली होती. दुकानांमध्ये झेराॅक्स, संगणक संच, फर्निचर आदी साहित्य होते.

न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर महापालिकेचे भूमी मालमत्ता अधीक्षक सारिका आकुलवार, अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख मोहन कांबळे हे जेसीबीसह पोलिस फौजफाटा घेऊन खोकी काढण्यासाठी िजल्हा परिषदेजवळ गेले. त्यामुळे खोकीधारकांची धांदल उडाली. खोकीधारकांनी तातडीने महापालिकेचे अपर आयुक्त विलास ढगे यांना भेटून दोन दिवस मुदत देण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांनी खोकीधारकांना मुदत िदली. येत्या दोन दिवसांत खोकी आणि साहित्य काढून घेण्याच्या सूचना महापालिकेने त्यांना िदल्या.