आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mitawa New Upcoming Marathi Film Promotion News In Solapur

प्रेम,मैत्री, त्याग आणि विरहाच्या भावनांचे मनस्वी चित्रणाचा "मितवा' चित्रपट व्हॅलेंटाइन डेला झळकणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - प्रेम,मैत्री, त्याग आणि विरहाच्या भावनांचे मनस्वी चित्रणाचा "मितवा' हा मराठी चित्रपट १३ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाइनच्या पूर्वदिनी झळकणार असल्याचे "मितवा'चे सहनिर्माता शेखर ज्योती यांनी पत्रकारांना सांगितले.

बालाजी सरोवर येथे चित्रपटातील प्रमुख कलावंत स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी प्रार्थना बेहरे यांच्यासह शेखर ज्योती यांनी प्रमोशनाच्या माहितीबरोबरच मितवा चित्रपटाचा प्रवास उलगडला.

मितवा चित्रपट महाराष्ट्रात तब्बल ३०० चित्रपटगृहांत झळकेल. यामुळे हा व्हॅलेंटाइन हा मितवा डे म्हणून साजरा होईल, अशी अपेक्षाही स्वप्नील जोशी याने व्यक्त केली. स्वप्ना जोशी दिग्‍दर्शित हा पहिलाच चित्रपट. उत्कष्ठ कथा, श्रवणीय संगीत, स्वप्निल, सोनाली पार्थनाचा दमदार अभनिय, गोवा येथील चित्रीकरण यामुळे चित्रपट आकर्षक ठरला आहे. श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन केले. पत्रकार परिषदेत स्वप्निल, सोनाली, पार्थना, शेखर ज्योतीसह, मितवा चित्रपटातील सहकलावंत टीम, विठ्ठल बडगंची आदी उपस्थित होते.

वालचंद, संगमेश्वर महाविद्यालय, आयएमएस इन्सिट्यूट आदी ठिकाण बुधवारी सकाळी मितवा चित्रपटाचे प्रमोशन झाले. शेखर ज्योती सहनिर्माते आहेत. मितवा चित्रपटानंतर "इश्क लव्ह प्रेम' हा त्यांचा तिसरा चित्रपट मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येईल. पहिला चित्रपट "अनवट' हा होता. स्वप्निल जोशी यांनी डेटस दिल्या तर सोलापूरशी संलग्नित असणारे कथानक येथे चित्रपट निर्मिती त्यांच्या विचाराधीन आहे, असे त्यांनी सांगितले.