आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • MLA Akabaroddina Owais Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुस्लिम, दलितांना विकासापासून दूर ठेवले- अकबरोद्दीन ओवेसी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- देशातआजवर छोट्या-मोठ्या ५० हजार हिंसक घटना घडल्या. त्यातून मुस्लिम कुटुंबं उद्ध्वस्त करण्याचाच प्रयत्न झाला. मुस्लिमांच्या संरक्षणासाठी असलेला जातीय हिंसाचार विरोधी कायदा काँग्रेसच्या केंद्र सरकारने मंजूर केला नाही. दुसरीकडे बाबरी मशीद उद्ध्वस्त करणाऱ्या भाजपकडून शंकराचार्यांच्या जागी दलित व्यक्तीला का बसविले जात नाही? हे पक्षच धर्मनिरपेक्षता मोडीत काढत आहेत, असा आरोप करीत काँग्रेस आणि भाजप या दोघांनाही एआयएमआयएमचे आमदार अकबरोद्दीन ओवेसी यांनी लक्ष्य केले.
ऑल इंिडया मजलीस इत्तेहादूल मुस्लिमीन (एआयएमआयएम)ची विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने सोमवारी होम मैदानावर रात्री जंगी सभा झाली. तीत ते प्रमुख वक्ते होते. त्यांनी आजवरच्या मुस्लिम समाजावर दंगलींच्या माध्यमातून झालेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. होम मैदान गर्दीने फुलून गेले होते. कोणतीही गडबड होता ही सभा पार पडली. विशेष म्हणजे मुस्लिम तरुणांची गर्दी लक्षणीय होती. श्री. ओवेसी सुमारे तासभर बोलले. काँग्रेसबरोबर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्यावर तुटून पडले. ते म्हणाले की, जवळपास अशा ५० हजार दंगलीसारख्या घटना झाल्या. त्यातून मुस्लिम कुटुंबंच उद्ध्वस्त झाली. व्यापार, उद्योग बंद पडले. दुसरीकडे गेल्या ६० वर्षांत मुस्लिम वस्त्यांचा विकास झाला नाही. रस्ते, पाणी, वीज या सुविधा पोहोचल्या नाहीत. संरक्षण मिळू शकले नाही. देशात आजवर अन्याय होत असतानाही हा समाज तो पाहात राहिला. त्यामुळे आता एकत्र येण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. ताकद दाखविली पाहिजे. देशात २५ कोटी मुस्लिमांची संख्या आहे. तरीही लोकसभा, विधानसभेपासून हा समाज दूरच राहिला आहे.
श्री. ओवेसी पुढे म्हणाले की, आम्ही आंध्र प्रदेशात चांगले काम केले आहे. तेथे वैद्यकीय, शैक्षणिक सुविधा स्वस्तात दिल्या. त्यामुळे मुस्लिम समाजातून डॉक्टर, पोलिस, आयएएस अधिकारी निर्माण केले. ते महाराष्ट्रात का होत नाही?, महाराष्ट्रातील मुस्लिमांची संख्या दीड कोटी असताना आर्थिक तरतूद मात्र फक्त ५०० कोटीच. हा न्याय कुठला? आंध्रात ५० लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असताना एक हजार कोटींचे बजेट आहे. आजवर मुस्लिमांची सर्वच क्षेत्रात पीछेहाट झाली. त्याला कारण काँग्रेस आणि भाजपच आहे, असा आरोपही त्यांनी केला.
रस्त्यावर स्वागत
भाषणऐकण्यासाठी सोलापूकरांनी सभेस एकच गर्दी केली होती. दूरच्या श्रोत्यांसाठी मंचाची उंची जास्त ठेवण्यात आली होती. उजव्या आणि डाव्या बाजूस मोठे स्क्रिन होते. दोन जनरेटची सोय होती. श्री. ओवेसी यांचे मार्गात स्वागत झाले. हैदराबाद नाक्यापासून ते होम मैदानपर्यंत जागोजागी मुस्लिम समाजबांधवांनी जल्लोषात स्वागत केले. ओवेसी हॉटेल लोटसमध्ये येणार असल्यामुळे तेथे काहांनी गर्दी केली होती. उशीर झाल्याने ते थेट सभेच्या ठिकाणी आले. शिट्या, टाळ्यांचा कडकडाट ते परतेपर्यंत होत राहिला. रात्री नांदेडला रवाना झाले.