आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचवीस वर्षांच्या काळात परिचारक विधानसभेत एकदाच बोलले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - २५वर्षांच्या काळात सुधाकरपंत परिचारक विधानसभेत फक्त एकदाच बोलले. मात्र, आपण अनेकदा प्रश्न उपस्थित करून मतदार संघाच्या विकासासाठी प्रयत्न केले. मतदार संघातील ३५ गावांचा पाणी प्रश्न, शहर विकासाच्या योजना, भुयारी गटार, रस्ते यासाठी शासनाकडून निधी मिळवल्याचे आमदार भारत भालके यांनी म्हटले. आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी आमदार भालके यांनी तालुक्यातील २२ गावांतील ग्रामस्थांची मंगळवारी सकाळी येथील तनपुरे महाराज मठात बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.

आमदार भालके म्हणाले, ‘मी जनतेचा आमदार आहे. जनता ठरवेल तो माझा पक्ष असेल. गेल्या पाच वर्षांत मान खाली घालायची वेळ येईल, असे एकही काम केलो नाही. विधानपरिषदेची निवडणूक असो की अधिकाऱ्यांच्या बदल्या यात आपण कुणाच्या पैशाला हात लावला नाही.’ अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती वामन माने होते.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, माजी उपनगराध्यक्ष संजय घोडके, कोळी समाजाचे गणेश अंकुशराव, निवृत्ती महाराज हंडे यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीस राजूबापू पाटील, विजयसिंह देशमुख, प्रशांत देशमुख, विठ्ठल कारखान्याच्या संचालकांसह विविध संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते.

शहरातूननाही प्रतिसाद : आमदारभालके यांच्या बैठकीस ग्रामीण भागातील लाेकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्या मानाने शहरातील नागरिकांची उपस्थिती अत्यंत तुरळक होती.

विचारविनिमयकी प्रचार : यावेळीबोलताना भालके समर्थक पदाधिकारी आणि नेतेमंडळींना भालके यांनी अपक्ष की एखाद्या पक्षाकडून निवडणूक लढवावी, याएेवजी परिचारक आणि शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्यावर तोफ डागली. त्यामुळे ही बैठक कार्यकर्त्यांशी विचारविनिमयासाठी बोलाविली होती की प्रचाराच्या जाहीर सभेसाठी हा संभ्रम उपस्थितांमध्ये निर्माण झाला.

बोला पुंडलिक वरदे
आमदारभालके यांनी भाषणाच्या शेवटी बोला पुंडलिक वरदे...चा गजर केला. तसेच माझ्या पाठीशी असलेल्यांनी हात उंच करावे, असे आवाहन केले. त्या वेळी उपस्थितांनी दोन्ही हात उंचावून त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.

भालकेखोटारडे
*खोटेबोल पण रेटून बोल, हा एककलमी कार्यक्रम भारत भालके यांचा आहे. प्रसिद्धीसाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. सुधाकरपरिचारक, माजीआमदार,
पंढरपूर
पंढरपूर येथे मंगळवारी कार्यकर्ते ग्रामस्थांशी विचारविनिमय करण्यासाठी आयोिजत बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार भारत भालके.