आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mla Bharat Bhalake Commnmet On Party Change In Solapur

भालके यांचे पुन्हा "वेट अ‍ॅण्ड वॉच'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवेढा - पक्षापेक्षा जनतेचा विचार सर्वश्रेष्ठ असून, मंगळवेढ्याबरोबर पंढरपूर मतदारसंघातील मतदारांचा कानोसा घेऊन लवकरच दिवसांत पक्षप्रवेश केला जाईल, असे प्रतिपादन आमदार भारत भालके यांनी केले.

मंगळवेढा येथील मेळाव्यात आमदार भालके बोलत होते. ते पुढे म्हणाले, “तालुक्याचा दुष्काळी कलंक पुसणारी ३५ गावांच्या पाणीपुरवठा योजनांना मंजुरीसाठी पाच वर्षांत जीवाचे रान केले. पुढील वर्षे दिल्यास शेतकऱ्याच्या शेतात पाणी आणून दाखवू विरोधकांना दारे धरण्याची वेळ आणू, असा उपहासात्मक टोला लगावला. त्याचबरोबर भविष्यात रेल्वे सर्व्हेक्षण, ग्रामीण भागातील मुला-मुलींसाठी वसतिगृह, अद्ययावत हॉस्पिटल, तीर्थक्षेत्र, एमआयडीसीत उद्योग पाण्याची उपलब्धता आदी प्रश्न प्राधान्याने मार्गी लावू.

कार्यकर्त्यांचा वेगवेगळा सूर
मंगळवेढायेथील कार्यकर्त्याच्या विचारविनिमय मेळाव्यात पक्षप्रवेशाबाबत मतभिन्नता दिसून आली. काही कार्यकर्त्यांनी पाणी प्रश्नासाठी सहकार्य करणाऱ्या काँग्रेस पक्षात जाण्याचा सल्ला दिला तर काहीनी राष्ट्रवादीसह महायुतीत जाण्याबाबत मत मांडले तर काही जणांनी तुम्ही कोणत्याही पक्षात जा, आम्ही तुमच्या पाठीशी राहू असे मत मांडले. निवडणुकीची घोषणा झाली असतानाही आ. भालके आजच्या मेळाव्यात पक्षप्रवेशाची घोषणा करतील या आशेने आले होते. मात्र त्याचा अपेक्षाभंग झाला.

मेळाव्यास नगराध्यक्षा अरुणा दत्तू, राहुल शहा, रामचंद्र वाकडे, मनोहर सांवजो, रामचंद्र जगताप, विजयकुमार खवतोडे, काशिनाथ पाटील, प्रा. नारायण घुले, धनंजय पाटील, भारत पाटील, राजाराम जगताप, मुरलीधर दत्तू, अजित जगताप, मारुती वाकडे, पोपट पडवळे,आदी उपस्थित होते.