आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रॅली, पदयात्रेने माने यांनी दाखवले बळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- मोटारसायकलरॅली, पदयात्रा काढत सोलापूर दक्षिण मतदारसंघासाठी आमदार दिलीप माने यांनी गुरुवारी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्ह्यात काँग्रेसकडून उमेदवारी दाखल करणारे ते पहिलेच उमेदवार आहेत.
उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच श्री. माने यांनी अर्ज दाखल करण्याचे जाहीर केले होते. दरम्यान, बुधवारी रात्री प्रदेश काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश होेता. सकाळी दहाला कुमठे गावातून पदयात्रेला सुरुवात झाली. मोटारसायकल, चारचाकी गाड्यांचा मोठा ताफा त्यांच्या समवेत होता. तसेच, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर महापालिकेच्या ११ प्रभागातील कार्यकर्ते उपस्थित होते. चार हुतात्मा पुतळ्यासह अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. अर्ज भरल्यानंतर काँग्रेस भवनमध्ये पत्रकारांशी बोलताना माने म्हणाले की, मतदारसंघामध्ये अनेक मोठी विकासाची कामे केली. मतदारांना मी सहज उपलब्ध होतो. मतदार मला निवडून देतील. महापौर सुशीला आबुटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार, बाजार समितीचे सभापती राजशेखर शिवदारे, उपसभापती चंद्रकांत खुपसंगे, माजी सभापती इंदुमती अलगोंडा, उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सभापती सुरेखा पाटील, नगरसेवक जयकुमार माने, नागेश ताकमोगे, सारिका सुरवसे, मधुकर आठवले, बाजार समितीचे संचालक प्रवीण देशपांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अप्पाशा काळे, कोळी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कोळी यांच्यासह सोलापूर शहर, हद्दवाढ भागासह दक्षिण उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
मानेंचे मुखवटे, पक्ष नगण्य
मानेयांच्या चेहऱ्याचे मुखवटे घालून कार्यकर्ते सहभागी झाले होते. काहींच्या खिशावर ‘कहो दिलसे दिलीप माने फिरसे’ बिल्ले लावले होते. त्याच्या तुलनेत पक्षाचे झेंडे, चिन्ह याची संख्या नगण्य होती.
दक्षिण तालुक्यातील नेत्यांची गैरहजेरी
पाचवर्षांपासून सोबत असणारे माजी मंत्री आनंदराव देवकते आज माने यांच्या सोबत नव्हते. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, तालुकाध्यक्ष पंचायत समिती सभापती गुरुनाथ म्हेत्रे, माजी सभापती भीमाशंकर जमादार, जिल्हा परिषद सदस्या श्रीदेवी पाटील, हरीष पाटील, जाफरताज पाटील नव्हते. राष्ट्रवादीचा एकही नेता नव्हता.