आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mla Pankaja Mundhe In Solapur For Sangharsh Yatra

आमदार पंकजांचे दोनवेळा स्वतंत्र स्वागत होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपमध्ये दोन गट पडले असून, आमदार पंकजा मुंडे यांच्या संघर्ष यात्रेच्या निमित्ताने ते उघड होत आहेत. संघर्ष यात्रेच्या तयारीसाठी निमंत्रण दिले नाही, असे म्हणत नाराज असलेल्या सात नगरसेवकांनी शनिवारी पक्ष कार्यालयात स्वतंत्र बैठक घेत बाळे चौकात आमदार मुंडे यांचे स्वतंत्र स्वागत करण्याचे ठरवले.

आमदार मुंडे यांच्या यात्रेच्या तयारीसाठी गुरुवारी आमदार विजयकुमार देशमुख यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यास निमंत्रण दिले नाही म्हणून शनिवारी नगरसेवक नागेश वल्याळ यांनी पुढाकार घेऊन स्वतंत्र बैठक घेतली. या वेळी सुमारे १०० कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी नगरसेविका मोहिनी पत्की, रोहिणी तडवळकर, नरसूबाई गदवालकर, नगरसेवक सुरेश पाटील, पांडुरंग दिड्डी, वीरभद्रेश्वर बसवंती, रामभाऊ तडवळकर, बाबूराव जमादार, सतीश कुदळे आदी उपस्थित होते. या वेळी बसवंती म्हणाले, कार्यकर्त्यांना विसरून काहीजण बैठक घेत आहेत. त्यामुळे आम्ही ही यात्रा यशस्वी करून दाखवतो. या वेळी सुरेश पाटील म्हणाले, भाजप ही कोणाची वैयक्तिक पार्टी नसून, ती सर्वसामान्याची आहे.
पक्षाच्या कार्यालयात आम्हीही बैठक घेऊ शकतो. आमदार पंकजा मुंडे यांची यात्रा आम्ही यशस्वी करणार आहोत. त्यांच्यासाठी पक्षातील मतभेद तुर्तास बाजूला ठेवू असे ते म्हणाले.