आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MLA Praniti Shinde, ,Latest News In Divya Marathi

कार्यकर्त्यांनो, गाफिल राहू नका : आमदार शिंदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर मतदार संघातून विरोधी पक्षाला उमेदवार पकडून आणावा लागला. तरीही कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना कमकुवत समजून गाफिल राहता कामा नये, असा सल्ला आमदार प्रणिती शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
सोलापूर लोकसभा मतदार संघाचे कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ माहिती व प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले. या वेळी त्या बोलत होत्या. आमदार प्रणिती म्हणाल्या, ‘सोलापूरकरांनी चाळीस वर्षांपासून दिलेला आशिर्वाद यामुळे सुशीलकुमार शिंदे आज उच्च पदावर आहेत. शिंदे हे निवडून येतीलच, परंतु त्यांना विक्रमी मताधिक्यांनी निवडून देणे गरजेचे आहे. सोलापूर शहरात जेवढी विकासकामे झाली आहेत, ती शिंदे यांनीच केली आहेत. भाजपला मित्रपक्षाची साथ मिळत नाही, अशी टोलेबाजी आमदार प्रणिती शिंदे यांनी केली. तसेच कार्यकर्ता हाच कणा असून मतदार हे राजा आहेत.
कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान शहर तिरंगामय करा, असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले. या वेळी शहराध्यक्ष धर्मा भोसले, माजी खासदार धर्मण्णा सादूल, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी महापौर महेश कोठे, नलिनी चंदेले, अँड. यू. एन. बेरिया, आरिफ शेख, संयोजक सुधीर खरटमल, फिरदोस पटेल, तौफिक शेख, सारिका सुरवसे, सुशिला आबुटे, कॉँग्रेस प्रवक्ते हाजीमलंग नदाफ, चेतन नरोटे, विवेक खरटमल, शिवलिंग कांबळे, पैगंबर शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
हमसे जो टकरायेगा..
आमदार प्रणिती शिंदे यांचे भाषण संपताच कार्यकर्त्यांनी ‘सुशीलकुमार शिंदे साहेब, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणा दिली. त्यावर आमदार प्रणिती शिंदे यांनी ‘हमसे जो टकराएगा मिठ्ठी में मिल जाएगा’ अशी जोरात घोषणा देताच कार्यकर्त्यांचा आवाज वाढला.
माने, यलगुलवार अनुपस्थित
कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी शहरातील कॉँग्रेस पक्षाचे नेते आणि नगरसेवक उपस्थित होते. मात्र, आमदार दिलीप माने आणि माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांची अनुपस्थिती होती.