आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी पुनर्वसन, मगच अतिक्रमण काढा- आमदार प्रणिती शिंदें

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- विजापूर रस्त्यावरील रेल्वे हद्दीतील १३०० घरांच्या अतिक्रमणाबाबत आमदार प्रणिती शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेत आधी त्या नागरिकांचे पुनर्वसन करा मगच अतिक्रमण हटवा, अशी मागणी केली आहे. अतिक्रमणाबाबत आ. शिंदे विभागीय रेल्वे व्यवस्थापक थॉमस यांच्यासोबत बैठक झाली.
गेल्या ३० वर्षापासून नागरिकांचे वास्तव्य आहे, या लोकांना पर्यायी जागेची व्यवस्था करूनच रेल्वेने अतिक्रमण काढावे. विकास होण्याच्या बाजूने आहोत, मात्र यामध्ये कोणावरही अन्याय होऊ नये, यासाठी रेल्वेने दक्षता घ्यावी. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचेही आ. शिंदे यांनी सांगितले. ज्या घरांचे अतिक्रमण आहे, त्या घरमालकांशीही आ. शिंदे यांनी चर्चा केल्या. यावेळी नगरसेवक पैगंबर शेख, सरस्वती कासलोलकर, मधुकर आठवले, ज्योती वाघमारे सुभाष वाघमारे, नागनाथ कासलोलकर, श्रीमंत सुरवसे, सुधाकर उडाणशिवे, श्रावण सोनवणे, यशवंत फडतरे, आदी नागरिक उपस्थित होते. विभागीय रेल्वे व्यवस्थापक जॉन थॉमस यांच्याशी चर्चा करताना आमदार प्रणिती शिंदे. यावेळी नगरसेवक पैगंबर शेख, सरस्वती कासलोलकर नागरिक.
रेल्वेच्या जागेवरील केटरिंग कॉलेजचे काय होणार ?
रेल्वेच्याअधिकाऱ्यांनी रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या जागेवर केटरिंग कॉलेज आहे. याबाबत सचिवस्तरावरही चर्चा झाली होती. यावर केटरिंग कॉलेजच्या जमिनीचे पैसे देण्यास महसूल प्रशासन तयार असल्याचे संबंधित रेल्वे अधिकारी यांना सांगण्यात आले आहे. मात्र याबाबत रेल्वे अधिका-यांची स्पष्ट भूमिका दिसली नाही. यामुळे केटरिंग कॉलेजचे काय होणार ? हा प्रश्नही उपस्थित झाला आहे.