आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रणिती शिंदे, ढेकळेंवर गुन्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- रूबीन गरातील(जुळे सोलापूर) रहिवासी तरुण सचिन मस्के यास मारहाण करून दमदाटी केल्याप्रकरणी आमदार प्रणिती शिंदे स्वीय सहायक ओंकार ढेकळे यांच्यावर न्यायालयाच्या आदेशान्वये सोमवारी विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
मस्के यांनी अॅड. विवेक शाक्य यांच्यामार्फत खासगी फिर्याद दिली होती. सत्तावीस आॅक्टोबर २०१३ रोजी ही घटना घडली होती. आमदार शिंदे यांच्याबद्दलचा मजकूर मस्के यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यावरून शिंदे आणि ढेकळे यांनी काही तरुणांना घरी पाठविले. मारहाण केली. गळ्याला चाकू लावून मारण्याची धमकी दिली. याबाबत पोलिसात गेल्यानंतर मस्के यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे न्यायालयात खासगी फिर्याद दिली. फौजदार मस्के तपास करीत आहेत.