आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अतिक्रमण कारवाई 'आऊटर'वर, आमदार प्रणिती शिंदे आंदोलकांच्या पाठीशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- मीटरगेजजागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी सोलापूर रेल्वे विभागाने मोठा फौजफाटा मागिवला होता. आता कारवाई होणारच अशी स्थिती निर्माण झाली असताना न्यायालयाचा आदेश मिळाल्याचे सांगत रेल्वेने कारवाईला गुरुवारपर्यंत स्थगिती दिली. त्यामुळे अतिक्रमण काढण्यासाठी मोठे पथक घेऊन गेलेल्या रेल्वेच्या पथकाला हात हलवत परतावे लागले. दरम्यान, रेल्वे कारवाईला विरोध करणारे या भागातील नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. रेल्वेने कारवाई मागे घेतल्याने तणाव निवळला असला तरी प्रश्न कायम आहे. या प्रकरणी फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

मीटर गेजवर झालेल्या अतिक्रमण प्रकरणी रेल्वे प्रशासन आणि नागरिक यांच्यांतील संघर्ष चांगलाच पेटला आहे. प्रकरण न्यायालयात गेले आहे. शनिवारी दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश के. सु. कुलकर्णी यांनी फेब्रुवारीपर्यंत रेल्वेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला स्थगिती दिली होती. परंतु न्यायालयाचा आदेश मिळालाच नाही, अतिक्रमण मोहीम राबविणारच यावर रेल्वे प्रशासन ठाम होते. सोमवारी तशी तयारीही करण्यात आली होती. रेल्वे पोलिस, बुलडोझर आणि इतर पथकांसह मोठा फौजफाटा मागवण्यात आला होता. दरम्यान, सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास कोर्टाचा आदेश प्राप्त झाल्याने कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कारवाईच्या भीतीने नागरिकही मोठ्या संख्येने जमा झाले होते. सकाळपासून तणावाचे वातावरण होते. दुसरीकडे डीआरएम कार्यालयात व्यवस्थापक जॉन थॉमस यांच्यासोबत रेल्वेच्या सर्व वरिष्ठ अधिका-यांच्या बैठकावर बैठका सुरू होत्या.अखेर न्यायालयाचा आदेश मानत कारवाई मागे घेतली. रेल्वेने अतिक्रमणप्रकरणी १३६० जणांना नोटिसा दिल्या आहेत.
रेल्वे प्रशासन कारवाई करणार, असे समजताच आमदार प्रणिती शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांना दिलासा दिला.

सोलापूर ते टिकेकरवाडी या मीटरगेज रेल्वे मार्गावर झालेले अतिक्रमण हटविण्यासाठी मागील शनिवारी न्यायालयाने अंतरिम स्थगती दिली होती. सोमवारी त्या आदेशाची प्रत बेलिफमार्फत रेल्वेचे सिनिअर सेक्शन वर्क्स अधिकारी यांना देण्यात आली. या अंतरिम स्थगितीवर फेब्रुवारी रोजी दुपारी अडीचच्या सुमाराला सुनावणी होणार आहे. सोलापूर ते टिकेकरवाडी दरम्यान रेल्वेच्या जागेवर दोन हजार जणांनी अतिक्रमण केले आहे. ती जागा ताब्यात घेण्यासाठी रेल्वे प्रशासन अतिक्रमण हटविण्याच्या तयारीत आहे. काही नागरिकांनी हे अतिक्रमण काढू नये म्हणून खासगी याचिका दिवाणी न्यायाधीश के. एस. कुलकर्णी यांच्या न्यायालयात दाखल केली आहे. सरकारी वकिलांनी म्हणणे मांडल्यानंतर पुढील निर्णय होईल. सरकारतर्फे प्रवीण शेंडे, याचिकाकर्त्यातर्फे व्ही. एस. आळंगे, अमित आळंगे हे वकील काम पाहत आहेत.

न्यायालयात रेल्वे बाजू मांडणार
न्यायालयाच्याआदेशाप्रमाणे रेल्वे प्रशासन फेब्रुवारीला आपली बाजु मांडणार आहे.'' नर्मेदेश्वर झा, वाणिज्य व्यवस्थापक.

शहर पोलिसांकडून नाही प्रतिसाद
अतिक्रमणकाढण्याच्या विषयावर रविवारी रात्री साडेदहा वाजता विभागीय व्यवस्थापक जॉन थॉमस यांच्या निवासस्थानी मोजक्या अधिका-यांची बैठक पार पडली. यात सोमवारी सकाळी वाजल्यापासून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. स्थानिक पोलिसांची मदतही घ्यायचे ठरले. मात्र, ऐन कारवाईच्या वेळी शहर पोलिसांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कारवाई झाली नाही.

सोमवारचा घटनाक्रम
*सकाळीवाजताअतिक्रमण काढण्यासाठी आरपीएफचा फौजफाटा घटनास्थळी दाखल.
*घरावरबुलडोझरफिरणार या भीतीने नागरिकांचा जमाव जमाला.
*साडेदहाच्यासुमारासआमदार प्रणिती शिंदे, महापौर सुशीला आबुटे अॅड. अमित आळंगे घटनास्थळी दाखल.
*कारवाईहोणारया भीतीने तणाव वाढला,
*अकराच्यासुमारासडीआरएम कार्यालयास न्यायालयाचा आदेश प्राप्त .
*आदेशिमळताचरेल्वे वरिष्ठ अधिका-यांचे बैठकांचे सत्र सुरू.
*साडेबाराच्यासुमरासविजापूर नाका पोलिस ठाण्याचे पोलिस हजर.
*दुपारीएकच्यासुमारास रेल्वे अधिकारी न्यायालयात दाखल.
*अखेरकारवाईकरण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय

अन्याय होऊ देणार नाही : शिंदे
रेल्वेप्रशासन कारवाई करणार, असे समजताच आमदार प्रणिती शिंदे, महापौर सुशीला आबुटे, नगरसेवक मधुकर आठवले, अॅड आळंगे आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या परिसरातील नागरिकांना दिलासा दिला. यावेळी शिंदे म्हणाल्या,"नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही. या प्रकरणी शेवटपर्यंत तुमच्या पाठीशी राहीन. विकासाला आमचा विरोध नाही. पण प्रथम येथील नागरिकांचे पु्नर्वसन करावे, अशी आमची मागणी आहे.''