आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रदिनी आमदारांना ध्वजवंदन करण्याची संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्ह्यातील आमदारांना पहिल्यांदाच महाराष्ट्र दिनानिमित्त मे रोजी तालुका मुख्यालयात ध्वजवंदन करण्याची संधी मिळाली आहे. दोन दोनपेक्षा अधिक मतदारसंघ जोडलेल्या मुख्यालयात ज्या मतदार संघाचे मतदार अधिक त्या मतदार संघातील आमदारांना ध्वजवंदन करण्याची संधी देण्यात आली आहे. ज्याठिकाणी विधानसभेचे सदस्य उपलब्ध नाहीत त्याठिकाणी विधान परिषदेचे सदस्य ध्वजवंदन करतील. विधान परिषद सदस्य नसतील त्याठिकाणी तहसीलदारांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात येणार असल्याचे शासनाने कळवले आहे.

१५ ऑगस्ट, २६ जानेवारी या राष्ट्रीय कार्यक्रमांबरोबरच मे महाराष्ट्रदिनी तालुक्यांच्या मुख्यालयात अधिकाऱ्यांऐवजी लोकप्रतिनिधींच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात यावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी लावून धरली होती. या पार्श्वभूमीवर नव्या सरकारने महाराष्ट्रदिनी लोकप्रतिनिधींच्या हस्ते ध्वजवंदन करण्याचे आदेश २२ एप्रिल दिले आहेत.

दोनपेक्षा अधिक तहसील कार्यालय असलेल्या मतदार संघात कोणी ध्वजवंदन करायचे? असा पेच शहर मध्य पंढरपूर मतदार संघात निर्माण झाला होता. शहर मध्य मतदार संघात शहर उत्तर शहर मध्य मतदारसंघ येतो तर पंढरपूर मतदार संघात पंढरपूर मंगळवेढा तालुके येतात. यामुळे अधिक मतदार संख्या असलेली मतदार संघाच्या आमदाराने ध्वजवंदन करावे, असे आदेश शासनाने काढले आहेत. उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात आमदार प्रणिती शिंदे पंढरपूर तहसील कार्यालयात आमदार भारत भालके ध्वजवंदन करतील. मंगळवेढा तहसील कार्यालयात विधान परिषद सदस्य दीपक साळुंखे ध्वजवंदन करणार आहेत.