आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MNS Activist Disturb Military School Admission Process In Satara District

सातारा सैनिक स्‍कूलमध्‍ये उत्तर भारतीय विद्यार्थ्‍यांना मनसे कार्यकर्त्‍यांनी हाकलले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा जिल्ह्यातील सैनिक स्कूलच्या प्रवेश प्रक्रीयेमध्‍ये महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेच्‍या कार्यकर्त्‍यांनी राडा केला. प्रवेशासाठी आलेल्या उत्तरप्रदेश आणि बिहारच्या विद्यार्थ्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करुन हाकलून लावले. आज दुपारी हा प्रकार घडला.

साताऱ्यातल्या प्रसिद्ध सैनिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी वैद्यकीय चाचण्या सुरु होत्या. त्यावेळी या प्रवेशांसाठी उत्तर भारतीय विद्यार्थी आल्याची माहिती मिळाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण करुन हाकलून दिले. वयाचे खोटे दाखले सादर करुन परप्रांतियांचा प्रवेश घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप करण्यात आला. त्‍यामुळे कार्यकर्त्‍यांनी हे पाऊल उचलले, असे मनसेच्‍या पदाधिका-यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे वय निश्चित करण्यासाठी वैद्यकीय चाचणी करावी आणि नंतरच प्रवेश द्यावा अशी मागणी मनसेने केली आहे. तसेच सैनिक स्‍कूलमध्‍ये मराठी विद्यार्थ्‍यांना प्राधान्‍य मिळावे, अशी मागणीही करण्‍यात आली आहे.