आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MNS Activists Broken Office In Solapur Municipal Corporation's Zonal Office

सोलापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयात मनसेच्या कार्यकर्त्यांची तोडफोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सोलापूर येथील महापालिकेच्या विभागीय (झोन) कार्यालय क्रमांक एकमध्ये तोडफोड केली. अर्ध्या तासाच्या तोडफाडीत कार्यालयाचे नुकसान झाले आहे.
येथील गणेश नगरात ड्रेनेज तुंबले होते. त्याविषयी तक्रार देण्यात आली. बुधवारी सकाळी साडेदहा वाजता मनसेचे काही कार्यकर्ते दत्त चौकातील कार्यालयात आले. आदर्श नगरसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल नगरसेवक चेतन नरोटे यांचा सत्कार सुरू होता. कार्यक्रम झाल्यानंतर झोन अधिकारी रेड्डी यांना तक्रार देण्यात आली. त्यानंतर पाहणीसाठी रेड्डी गणेश नगरकडे जाण्यास बाहेर पडत होते, त्यावेळी सुमारे 15 ते 20 मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत तोडफोड केली. प्रभाग समिती सभापती शांताबाई दुधाळ यांच्या कार्यालयाच्या काचा फोडल्या. खुर्च्याही फेकून दिल्या.
दुसरी घटना
मनसेकडून तोडफोड होण्याचा हा दुसरा प्रकार आहे. बाळे परिसरात नागरीकामे केली नाहीत म्हणून यापूर्वी श्रवण भंवरसह अन्य कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. त्यानंतर पुन्हा मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.