आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे कार्यकर्त्यांची झोनमध्ये तोडफोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी महापालिकेच्या विभागीय (झोन) कार्यालय क्रमांक एकमध्ये तोडफोड केली. सुमारे अर्धातास हा गैरप्रकार सुरू होता. यात काही सामानाचे नुकसान झाले आहे.
गणेश नगरात ड्रेनेज तुंबले. त्याविषयी तक्रार देण्यात आली. सफाई झाली नाही. बुधवारी सकाळी साडेदहा वाजता मनसेचे काही कार्यकर्ते दत्त चौकातील कार्यालयात आले. आदर्श नगरसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल चेतन नरोटे यांचा सत्कार सुरू होता. कार्यक्रम झाल्यानंतर झोन अधिकारी रेड्डी यांना तक्रार देण्यात आली. त्यांतर 15 ते 20 मनसे कार्यकर्ते कार्यालयात घुसले. घोषणाबाजी करत तोडफोड केली. प्रभाग समिती सभापती शांताबाई दुधाळ यांच्या कार्यालयाच्या काचा फोडल्या. खुच्र्या फेकून दिल्या. फायली भिरकावून दिल्या. भांबावलेले कर्मचारी हा प्रकार हतबलतेने पाहात उभे होते.
मनसे जारी केले निवेदन
वारंवार तक्रार करून त्याची दखल घेतली नाही. मनसेचे कार्यकर्ते झोन कार्यालयात सांगण्यासाठी गेल्यावर तेथे सत्कार समारंभ चालू होता. त्यात अधिकारी गुंग होते. महापालिका आयुक्तांना दमदाटी केली असता, नगरसेवकांवर आयुक्तांनी कारवाई केली नाही. मोडतोडचे सर्मथन आम्ही करणार नाही. पण, नागरिक तेथे येईपर्यंत महापालिका गप्प का? असा प्रश्न मनसेने केला आहे. तसे निवेदन मनसेच्या वतीने देण्यात आले. त्यावर दिलीप धोत्रे, भूषण महिंद्रकर, युवराज चुंबळकर, उमेश रसाळकर, प्रशांत इंगळे, सुनील हिबारे आदींच्या सह्या आहेत.
कर्मचारी करणार निषेध
दरम्यान, या प्रकाराचा निषेध कर्मचारी करणार आहेत. सकाळी सातला निदर्शने करतील आणि काळ्याफिती लावून कामकाज करतील, अशी माहिती महापालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक जानराव यांनी दिली.
आयुक्त धावले
घटनेची माहिती मिळताच महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, साहाय्यक आयुक्त डॉ. पंकज जावळे हे झोन कार्यालयात आले. घटनेची माहिती घेतली. संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. प्रभाग समिती सभापती दुधाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पद्माकर काळे, बहुजन समाज पक्षाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी भेट दिली.
15 जणांवर गुन्हा दाखल
मनसेचे कार्यकर्ते अमोल झागडे यांच्यासह पंधरा जणांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 143, 147, 149, 353, 452नुसार सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि मुंबई पोलिस कलम कायदा, 3,7 व 135 कलमांनुसार फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सुमारे पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अद्याप अटक झालेली नाही.
ही दुसरी घटना
मनसेकडून झोन क्रमांक एकची तोडफोड होण्याचा दुसरा प्रकार आहे. बाळे परिसरात नागरीकामे केली नाहीत म्हणून यापूर्वी र्शवण भंवरसह अन्य कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. त्यानंतर पुन्हा मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.