आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा बँकेविरोधात आता मनसे उतरली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेनंतर ‘मनसे’नेही जिल्हा बँकेच्या विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. स्वत:च्या कारखान्यांना कोट्यवधी रुपयांची कर्जे घेणार्‍या संचालकांनी सामान्य शेतकर्‍यांना पीककर्जे नाकारली. संचालकांच्या कारखान्यांत बँकेची मोठी रक्कम थकीत आहे. त्याचा भरणा करण्याच्या मागणीसाठी बँकेच्या मुख्य कार्यालयासह प्रत्येक शाखेसमोर आंदोलन करण्यात येईल, असे पक्षाचे जिल्हाध्यक्ष भूषण महिंद्रकर म्हणाले. 1 जानेवारीला होणार्‍या आंदोलनात शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा संघटक दिलीप धोत्रे यांनी केले.

मागण्या : थकबाकीदारांची नावे जाहीर करावीत, मालमत्ता जप्त करावी, शेतकर्‍यांना पीककर्जे द्यावीत, दोषी संचालकांवर गुन्हे दाखल करावेत

यांच्यावर कारवाई नाही?
शेतकर्‍याकडे दोन ते तीन हजार रुपयांचे वीज बिल थकीत असताना, त्यांची वीजजोड तोडण्याची कारवाई होते. बँकेची शंभर कोटी रुपये थकवणार्‍या संचालकावर कारवाई का नाही? मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत निर्देश दिलेले आहेत. तरीही सहकार खाते गप्प का?’’ भूषण महिंद्रकर, जिल्हाध्यक्ष, मनसे