आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात मनसे कार्यकर्त्यांचा वीस मिनिटांचा ‘दिखावा’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरातील मनसे कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी सोलापूर-पुणे महामार्गावर अल्पकाळ रास्ता रोको आंदोलन केले. 11.20 वाजता दुचाकी आणि चारचाकी गाड्यांतून कार्यकर्ते आंदोलनस्थळी आले; परंतु ते पोहोचण्याआधीच महामार्गावर पोलिसांचा फौजफाटा तैनात असल्याने 20 मिनिटांत निदर्शने करत, घोषणाबाजी करत, फोटो काढून घेत कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला.

‘कोणतीही तोडफोड न करता, सर्वसामान्यांना त्रास होणार नाही.. अशा पद्धतीने आंदोलन करा....’ मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवारी राज्यातील आपल्या शिलेदारांना हे आदेश दिले होते. मात्र, ‘जोशात’ असलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याचेही आदेश धाब्यावर बसवून राज्यभर ‘राडा’ घालून सामान्यांनाच लक्ष्य केले. हातावर पोट असणारा रिक्षावाला, बाहेरगावी निघालेले कुटुंबीय व आंदोलनाला पाठिंबा देणार्‍या माल वाहतूकदारांनाच मुंबईत फटका सहन करावा लागला.