आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मनसे’चे 16 उपाध्यक्ष बरखास्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहर कार्यकारिणीची रचना बदलली आहे. त्यात आता 16 ऐवजी आठ उपाध्यक्ष राहतील. या वृत्ताला सोलापूरचे संपर्क अधिकारी प्रकाश दरेकर यांनी दुजोरा दिला आहे.

या 16 जणांना बरखास्त करण्यात आले आहे. आठ उपाध्यक्षांची निवड प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे. पक्षाची बैठक शासकीय विर्शामगृहात सकाळी 11 वाजता प्रकाश दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी जिल्हा संघटक दिलीप धोत्रे, जिल्हा उपाध्यक्ष भूषण महिंद्रकर, शहराध्यक्ष प्रशांत इंगळे, युवराज चुंबळकर, अमर कुलकर्णी, रवी शिंदे, सुनील हिबारे आदी उपस्थित होते.

तयारीला लागावे : दरेकर
अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षात काही बदल सुचवले आहेत. जिल्हा व शहरात सचिवपदाची नियुक्ती करण्याची प्रक्रिया चालू आहे. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. जिल्ह्यात मनसेला भक्कम बनवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असे आवाहन दरेकर यांनी केले.