आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुकटच्या ‘अ‍ॅप्स’चे आकर्षण फसवणुकीचे देईल टेन्शन..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - इंटरनेट आणि मोबाइलच्या माध्यमातून अनेक बनावट नावाच्या कंपन्या नव्या युर्जसना शोधत असतात. बनावट अ‍ॅप्स फुकट देणे, 20 जणांचे एकत्र संभाषणाचे आमिष दाखवणे, ऑनलाइन रमी, गुंतवा कमी, मिळवा जास्त, राजस्थानला येऊन फुकट सोने न्या किंवा तुम्हाला कोका कोला कंपनीचे मिलियन डॉलर्सचे ग्रँड बंपर प्राइज लागले आहे, असे आकर्षण दाखवले जाते. परंतु अशा प्रकारातून वास्तव कमी आणि फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. त्यासाठी स्वत:च दक्ष आणि सतर्क राहणे, हाच पर्याय आहे.

असे मिळते निमंत्रण
स्मार्टफोनधारकांसाठी ‘प्ले-स्टोअर’मध्ये 22 नोव्हेंबर 2013 ला एक अ‍ॅॅप्लिकेशन अपलोड करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने कुठल्याही व्यक्तीच्या मोबाइल अथवा लँडलाइनची कॉलर आयडी हॅक करून फोन करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गुन्हेगार व अतिरेकी त्याचा गैरवापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अ‍ॅपच्या साहाय्याने 20 जणांना एकाचवेळी एकत्र बोलता येते, असा ही अ‍ॅप पुरवणार्‍यांचा दावा आहे. जरी ही सुविधा उपलब्ध असली तरी गैरवापर होण्याची शक्यताच जास्त आहे. यातून सुटका हवी असल्यास कॉन्फरन्स हा पर्याय आहेच ना? तसेच सिमक्लोनचा धोकाही नव्याने निर्माण झालाच आहे.

नायजेरीयन टोळीचे कारस्थान
मध्यंतरी बरीच बनावट नावे आणि आलिशान ऑफिसेस दाखवून जनसामान्यांची लूट करण्याचा प्रकार झाला होता, होतही आहे. 2011 मध्येच आर्यरूप टुरिझम नावाने गुंतवा कमी, मिळवा जास्त या आमिषाखाली करोडो रुपयांची फसगत झालेली उदाहरणे आहेत. अशा कुरापती नायजेरीयातील टोळी करते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

सिम क्लोन म्हणजे काय?
सिम क्लोनिंग एक समांतर कनेक्शन आहे, ज्यातून एका क्रमांकाचा क्लोन तयार करून त्याचा गैरवापर केला जातो. ज्या व्यक्तीकडे क्लोन केलेले सिमकार्ड असते, तो मूळ सिमकार्डधारकाचे सर्व फोन कॉल्स ऐकू शकतो आणि टॅपही करू शकतो. हे क्लोनिंग आपल्या सिमकार्डपर्यंतच सीमित राहात नाही, तर मेमरी कार्ड, डेटा कार्डही दुसरीकडे कॉपी केले जाऊ शकते.

हे मिस्ड कॉल धोकादायक
+92, + 372, +90, +09 या क्रमांकाने सुरुवात असलेले मिस्ड कॉल धोकादायक असू शकतात. या मिस्ड कॉलला प्रतिसाद दिल्यास सिम क्लोनिंगचा धोका उद्भवू शकतो.त्यामुळे अशा क्रमांक असलेला एखादा अनोळखी फोन असल्यास शक्यता तो रिसीव्ह करणे टाळले पाहिजे.

कलम 66 खाली गुन्हा नोंदवा : अ‍ॅड. माळी
या अ‍ॅप्स भारतीय कायद्याच्या हिशेबानी बेकायदेशीर आहेत. कुठलाही नशीब हा फॅक्टर बेकायदेशीर आहे. जर संगणक किंवा मोबाइलद्वारे फसवणूक झाली तर माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम 66 खाली जवळच्या पोलिसांत फिर्याद दाखल करता येते. अशा अ‍ॅप्समध्ये फसवणुकीची शक्यता असल्याने स्वत:हून तो डाऊनलोड करून घेऊच नये, असे सायबर कायदा तज्ज्ञ (मुंबई उच्च् न्यायालय) अ‍ॅड. प्रशांत माळी सांगितले. मेल किंवा मेसेजद्वारे देण्यात येणारे बक्षीस मिळवण्याकरता पैसे जमा करण्यास सांगितले जाते. त्यात सुरुवातीला बक्षिसाचे पार्सल सोडवून घेण्यासाठी विमानतळ प्राधिकरण फी, रजिस्ट्रेशन स्टँप फी, बक्षीस विदेशात लागल्यामुळे ते भारतात आणण्यासाठी दहशतवादविरोधी सर्टिफिकेट फी, कोड क्रमांक फी असे शुल्क घेतले जाते. एवढे पैसे भरल्यानंतर बक्षिसप्राप्त रक्कम ब्रिटिश पाऊंड किंवा अमेरीकन डॉलरमध्ये असल्याने त्याचे रूपांतर करण्यासाठी पुन्हा काही रक्कम सांगितली जाते. परंतु इतक्या पूर्तता केल्यानंतरही आपणास इप्सित असलेले बक्षीस हाती पडणे अशक्य कोटीतील गोष्ट असते. असे प्रकार घडलेलेही आहेत, घडताहेत. त्यासाठी स्वत: काळजी घ्यावी. काहीप्रकारात सुरक्षिततेसाठी बँकेचा पासवर्ड बदला असे फेक (बनावट) मेल येतो. बँकेच्या वेबसाईटवर जाण्यासाठी लिंक दिली असेल तर त्या लिंकद्वारे वेबसाईटवर जाऊ नये, असे माळी म्हणाले.

माहितीची चोरीही वाढतेय
इंटरनेटवरून माहितीच्या चोरीचे प्रमाण सर्वाधिक आहे. माहिती पाठवून धोका नसल्याचे अनेकांना वाटते. परंतु याद्वारेच बनावट पासपोर्ट, तसेच अकाऊंटमधील पैसे परस्पर लांबवण्याचे प्रकार करतात. यासाठी जवळपास 29 प्रकारची माहिती मागवण्यात येते. ज्यात स्वत:चे, बँकेचे नाव, अकाऊंट, बँरच, पत्ता, फोन नंबरचा समावेश असतो.

..तर असेल धोका
मोबाइलवरून फसवणुकीचे नवे फंडे समोर येत आहेत. यात सिम क्लोनिंगचे प्रमाण अधिक आहे. दूरसंचार मंत्रालयाने सिम क्लोनिंगचा देशाच्या सुरक्षिततेला धोका असल्याचे म्हटले. अनोळखी नंबरवर कॉलबॅक केल्याने सिम क्लोनिंगचे शिकार होऊ शकतात.