आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरातील पंचांगकर्ते दाते यांनी तयार केले मोबाइल अॅप्लिकेशन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापुरातील दाते पंचांगांचा शतकोत्तर अंकाचा प्रकाशन सोहळा रविवारी पार पडला. शतकोत्तर टप्पा गाठताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सोप्या पद्धतीने पंचांगाची माहिती उपलब्ध व्हावी याकरिता अॅड्रॉइड अॅप्लिकेशन तयार केले असल्याची माहिती, या कार्यक्रमात देण्यात आली. तसेच, मोबाइलवर सहज पाहता येईल अशा या अॅपची माहिती ओंकार दाते वनिय दाते यांनी दिली. लोकाग्रहास्तव आणि सोयीसाठी हे अॅप्स तयार करण्यात आले असून त्याचा वापर सोप्यापद्धतीने करण्याचे आवाहनही दाते परिवाराने या वेळी केले आहे. या अॅपचे विक्री मूल्य साडेपाच ते हजार रुपये असे आहे.
असे असेल मोबाइल पंचांग
मोबाइलवरहे पंचांग पाहता येईल. हे एकप्रकारचे अँड्राईड अप्लिकेशन आहे. यावरतीही अक्षांश रेखांशाचे गणित आहे. मुळात यात प्रत्येक जिल्ह्यानुसार माहिती आहे. परंतु विनामूल्य व्हर्जन वापरताना तेथे मुंबईचे अक्षांश रेखांश पाहून पुरविण्यात आलेली माहिती आहे तर तर सशुल्क पंचांगासाठी गुगल प्ले ने ५१ रुपये शुल्क ठेवले आहे. यात खास आपल्या गावच्या अक्षांश रेखांशावरून दिलेली परिपूर्ण ूमाहिती आहे. तसेच शुभ अशुभ मूहूर्त, वेळ, राहूकाळ आदींची माहिती, विवाह, उपनयन, वास्तूशांत आदींची माहिती लवकरात लवकर अपलोड होणार आहे. तसेच मराठीतील अॅप लवकरच अॅपलवर येणार आहे.

जन्मपत्रिका अॅप
दातेयांनी यापूर्वी याचे व्हर्जन काढले असून आता त्यामध्ये अद्ययावत माहिती देण्यात आली आहे. आता हे शेवटचे व्हर्जन आहे. दाते संहिता जन्मपत्रिका अॅप मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. सायन निरयन गणित पद्धतीव्दारे पत्रिका तयार केली जाते. विवाहमेलन नाडीकोष्टकव्दारे याची रचना करण्यात आली आहे. परदेशात जन्म झाला असेल तर तेथे डेलाइट किंवा समर टाइम म्हणून घड्याळ एक तास पुढे केले जाते. अशावेळेस अचूक पत्रिका काढणे अवघड जाते. परंतु या सॉफ्टवेअरने अचूक पत्रिका काढता येते.