आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामुदायिक सोहळा: मोची समाजातील २० जोडपी धूमधडाक्याने विवाहबंधनात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहरात सामुदायिक विवाह सोहळ्यांचा जणू धूमधडाकाच सुरू आहे. विविध समाज घटकांनी पुढाकार घेऊन गरीब कुटुंबांना दिलासा देण्यासाठी अशा सोहळ्यांचे उपक्रम सुरू केले. रविवारी जांबमुनी मोची समाजाने २० जोडप्यांचा सामुदायिक विवाह केला. हा सोहळाही अतिशय धूमधडाक्यात झाला. वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.
बापूजीनगरातल्या मारुती मंदिर पटांगणात दुपारी हा सोहळा झाला. अक्षतापूर्वीच वधू-वरांची वरात काढण्यात आली. सफारी आणि शालूतील वधू-वर नटून थटून कार्यस्थळी आले. त्यानंतर अक्षता सोहळा झाला. या वेळी आमदार प्रणिती शिंदे, महापालिकेतील पक्षनेते संजय हेमगड्डी, नगरसेविका अनिता म्हेत्रे, सरस्वती कासलोलकर, माशप्पा विटे, सुरेश नारायणकर, माजी महापौर विठ्ठल करबसू जाधव आदी उपस्थित होते. अक्षतानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर वधू आणि वरपक्षाकडून आलेल्या सुमारे १० वऱ्हाडी मंडळींना भोजनाचा स्वाद घेतला.
5 दिवसांत 55 जोडपी विवाहबद्ध
गेल्यापाच दिवसांत सुमारे ५५ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा झाला. सेवाभावी संस्था, समाज आणि सामाजिक संघटनांनी या सोहळ्यांचे आयोजन केले होते.
कष्टकरी माणसं, गरीब कुटुंबं
मोची समाज हा मागासलेला आहे. या समाजातील तरुण प्रामुख्याने बांधकाम क्षेत्रात मजुरी करतात. महिला कचरा वेठबिगारी आणि कचरा वेचण्याचे काम करतात. त्यांची आर्थिक स्थिती हलाखीची असते. त्यांना दिलासा देण्यासाठीच दरवर्षी हा उपक्रम करण्यात येतो. त्याचे नेटके नियोजन करण्यात येते. त्यात सारे समाजबांधव सहभागी होतात. समाजातील काही धनिक मंडळी वधू-वरांसाठी वस्त्रे देतात. काही राजकीय नेते आर्थिक मदत करतात. त्यातून हा सोहळा होतो, अशी माहिती संयोजकांनी दिली.
संस्था जोडपी

डीकेबहुउद्देशीय संस्था २५
बृहन्मठ होटगी संस्था ०७
बमलिंगेश्वर संस्था ०४
वडार समाज संस्था ०५
बहादूर मित्रमंडळ ०८
तोगटवीर समाज ०६