आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modern Urban Culture,Latest News In Divya Marathi

शहराच्या कचर्‍याची उंचच काम‘गिरी’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- तुळजापूर रस्त्यालगत भोगाव येथील 45 एकर परिसरात आता लहान-उंच टेकड्या आणि काही डोंगर तयार झाले आहेत. या ‘गिरीं’वर पक्ष्यांचे थवेच्या थवे बसलेले दिसतात. पण, ही भूरचनेतील उलथापालथ किंवा निसर्गाची किमया नाही, तर ती आधुनिक शहरी संस्कृतीच्या कचर्‍याची काम‘गिरी’ आहे.
सोलापूर बस स्थानकापासून तीन किमी अंतरावर असलेल्या परिसरात महापालिकेचा कचरा डेपो आहे. गेल्या दहा वर्षांपासून विल्हेवाट लावली नसल्याने कचर्‍याने परिसर व्यापला आहे. दुर्गंधी पसरली आहे. सगळीकडे कचर्‍याचे ढीग साचून लहान-मोठी टेकाडे तयारी झाली आहेत.
कचरा टाकण्यासाठी परिसरात जागा शिल्लक नाही. आहे तो कचरा तेथेच ढकलून मोठा डोंगरवजा पर्वत करण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाचा आहे. त्यामुळे कचरा टाकण्यास जागा उपलब्ध होऊ शकेल. मात्र, कचर्‍याची विल्हेवाट लावणे महापालिकेच्या प्राधान्यक्रमात नाही.
भोगाव कचरा डेपो फुल्ल झालेला असून परिसरात अतिशय दुर्गंधी पसरत आहे. आता दररोज शहरातून उचलण्यात येणारा कचरा बाळे परिसरातील डेपोत टाकावा लागणार आहे. येथील 18 एकरचा परिसर भरल्यानंतर पुढे काय, हा प्रश्न उपस्थित होतो. महापालिका प्रशासनाने आतापासूनच तयारी केल्यास भविष्यातील कचरा विल्हेवाट लावण्याची समस्या उद्भवणार नाही.
शहरात रोज 250 ते 300 टन कचरा निर्मिती होते.
त्यापैकी 200 ते 225 टन कचरा समिक्षा कन्ट्रक्शन कंपनीच्या वतीने उचलण्यात येतो. प्रतिटन 264.75 रुपये या प्रमाणे मनपा मक्तेदाराला शुल्क अदा करते. भोगाव परिसरात वजन करून कचरा टाकला जातो. दहा वर्षांपासून तेथील कचर्‍याची विल्हेवाट लावलेली नाही.