आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी गुरुजींची शाळा, कुठे टीकास्त्र तर कुठे स्वागत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येत्यासप्टेंबरला शिक्षक दिन आहे. दरवर्षी या दिनाच्या निमित्ताने थोर तत्त्वज्ञानी डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतींना उजाळा दिला जातो. शिक्षक दीन झालाय असेही म्हटले जाते. पण यंदा शिक्षक दिनापूर्वीच आठवडाभर या दिवसाची चर्चा सुरू झालीय ती मोदी गुरुजी त्या दिवशी सक्तीची शाळा घेणार असल्यामुळे.

या दिवशी पंतप्रधान मोदी यांचे भाषण होणार आहे. त्याचे थेट प्रक्षेपण प्रत्येक शाळेत करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. हे भाषण विद्यार्थ्यांपर्यंत लाइव्ह पोचवायचे आहे. याची जबाबदारी मुख्याध्यापकांवरच दिली अाहे. टीव्ही नाही, केबल नाही, वीज गेली तर काय करायचे, जनरेटर नसला तर काय करायचे, पाऊस आला तर काय करायचे, अशी कोणतीही सबब चालणार नाही. करायचे म्हणजे करायचे. मोदी गुरुजींच्या या आदेशावर व्हाटस अपवर प्रतिक्रिया उमटल्या नसत्या तरच नवल.

भाषण दुपारी ते ४.४५ असे असेल. किमान ते सकाळी तरी असावे. मुले दिवसभर कसे राहतील? शाळांत पंखे, लाइट असतीलच असेही नाही. हे सक्तीचे करू नये असा सल्ला अनेक नेटिझन्सनी दिला आहे. का लहान मुलांना राजकीय डोस देण्याचा प्रयत्न करताय. ही आरएसएसची ब्रेनवॉिशंगची स्ट्रॅटेजी आहे इथंपर्यंत काही जणांकडून टीकास्त्र सोडले गेले आहे. आत्ता प्रधानमंत्र्यांचे भाषण एेकायला केवळ १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीची वाट बघत बसायची गरज नाही म्हणावे, अशी टिपण्णी एकाने केलीय. बंधनकारक का केले, भाषणात मुद्दा काय असेही प्रश्न उपस्थित केले गेले आहेत.

यानिमित्तानेटीव्ही तरी येतील
मोदींनीगुजरातमध्ये असताना हा उपक्रम राबवला होता. आणि बच्चे कंपनींनेही त्यांना चांगला प्रतिसाद दिला होता. यानिमित्ताने शाळांमध्ये टीव्ही सेट तरी बसतील, अशा स्वागतशील प्रतििक्रयाही उमटल्या. एकूणच राजकारण पाहता प्रतििक्रया उमटणे स्वाभाविकच.आता सप्टेंबरपर्यंत आचारसंहिता लागू नाही झाली तर मिळवले. अन्यथा शाळांतून राजकीय प्रचार केला म्हणून नवा वाद उदभवणार हे नक्की., हम स्कूल जानेवाले है... मोदी गुरुजींका भाषण सुननेवाले है... असे गात गात मुलांना शाळेत बोलवा, असे तर जीआरमध्ये नाही ना याची चाचपणी गुर्जी लोक करताना दिसून येत असल्याच्या मश्किल प्रतिक्रियाही येत आहेत. -वेब रिपोर्टर