आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Pledge In The Law Live At Solapur, Divya Marathi

टिळक चौकात मोदींचा शपथविधी होणार लाइव्ह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोमवारी सायंकाळी सहा वाजता नरेंद्र मोदी यांचा देशाच्या राजधानीत पंतप्रधानपदाची शपथ घेण्याचा सोहळा होणार असून तो सोलापुरातील टिळक चौकात लाइव्ह दाखवण्यात येणार आहे. लोकांना कार्यक्रम पाहता यावा यासाठी भाजप प्रभाग क्रमांक 14 आणि व्यापारी असोसिएशनने 10 बाय 10 च्या स्क्रीनवर प्रोजेक्टरद्वारे कार्यक्रम दाखवण्याची सोय केली आहे. 200 खुच्र्यांची सोय, कार्यक्रमस्थळी भली मोठी रांगोळी, सुगंधी दूध व मिठाई वाटप, फटाक्यांची आतषबाजी, गुलाल उधळण आदी तयार करून आनंद साजरा करण्यात येणार आहे. मोठय़ा संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. आमदार विजय देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित असतील.