आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mohammed Ajharuddina Rally At Solapur, Latest News In Solapur

बोलणे सोपे असते, कृती अवघड, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मोहम्मद अझरूद्दीन यांची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- गेल्या६० वर्षात काँग्रेसने या देशावर राज्य केले आहे. आज देशात जो काही विकास झाला आहे तो काँग्रेसनेच केला आहे. पण सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नुसते बोलत आहेत. कृती अवघड असते, हे त्यांना कळून चुकेल. असे मत, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार माजी खासदार मोहम्मद अझरूद्दीन यांनी मांडले.
काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे, विश्वनाथ चाकोते, सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रचारासाठी अझरूद्दीन रविवारी सोलापुरात आले होते. सकाळी काँग्रेस भवनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या १५ वर्षापासून काँग्रेस राज्यात सत्तेवर आहे. राज्यात अनेक चांगली कामे झाली आहेत. त्यामुळे जनता पुन्हा काँग्रेसला निवडून देईल, असा दावा त्यांनी केला.

निवडणूक निधर्मी असावी
काँग्रेसपक्ष जातीय मुद्दे घेऊन कधीच लढत नाही. निवडणूक निधर्मी असावी. काँग्रेसचा तोच अजेंडा रािहला आहे. अन्य पक्ष जातीय अजेंड्यावर निवडणूक लढवित आहेत. असा आरोपही त्यांनी केला. १९८४ मध्ये सोलापुरात आलो होतो, आता शहरात खूपच बदल झाला असल्याची आठवण त्यांनी सांगितली.
मतविभागणीपुरताच एमआयएम
एमआयएमपक्ष जिंकण्यासाठी नव्हे तर मतविभागणी करण्यापुरताच मर्यािदत आहे. मोठ्या पक्षासमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न असतो. पण त्यातून त्यांना काहीही साध्य करता येण्यासारखे नाही, अशी प्रतिक्रिया एमआयएम पक्षासंदर्भातील प्रश्नावर अझरूद्दीन यांनी व्यक्त केली.