आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाल रंगभूमीच्या नव्या चळवळीची नांदी, मोहन जोशी यांनी साधला 'दिव्य मराठी'शी संवाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महाराष्ट्रातले पहिले बालनाट्य संमेलन भरवणे म्हणजे बाल रंगभूमीच्या एका नव्या चळवळीची सुरुवात असल्याची भावना नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना व्यक्त केली.
गेल्या अनेक वर्षांपासून या संमेलनाचे कार्यक्रम माझ्या मनात संकल्पित होते. काही कारणांमुळे कामाच्या व्यापामुळे आजवर ते शक्य झाले नाही. यंदाच्या वर्षी संपूर्ण वर्षभराचे कार्यक्रम आखून त्याच्यावर मध्यवर्ती शाखा ठिकठिकाणच्या स्थानिक शाखा असे सर्वजण मिळून काम करणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्या बाल कलावंत मंडळींना एका नव्या रंगभूीमीचा अनुभव घेता येणार आहे. त्यासाठी चर्चा सत्र, प्रशिक्षण सारे काही करण्याचे योजिले आहे.
संमेलनाच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी संपूर्ण राज्यातील बाल नाट्य चळवळीला योगदान देणाऱ्या नवे बाल कलावंत घडवणाऱ्या संस्थांना सोलापूर येथे बोलवले जाणार आहे. त्यांच्याकडून नव्या कलावंतांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. संमेलनात होणाऱ्या नाटकांवर चर्चा करण्यासाठी काही तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षकांना बोलावले जाईल. बाल कलावंतांचे सादरीकरण झाल्यानंतर त्या नाटकात काय उत्तम होते काय कमी होते याची चर्चा घडवून आणली जाईल. त्याने मुलांच्या प्रगल्भतेत वाढ होणार आहे. याचे नियोजन लवकरच राज्यातील सर्व शाखांना दिले जाणार आहे.
राजकीय रसिकता मोठी
माजीकेंद्रीय सुशीलकुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे, महापौर आबुटे या सर्वांनी संमेलन सोलापूरला पार पडावे, यासाठी पत्र देऊन आग्रह केला. त्यामुळे हे यश उपनगरीय शाखेला मिळाले आहे. २००८ च्या आठवणी पाहता राजकीय शक्तीची रसिकता महत्त्वाची आहे, असे वाटते.
सोलापूरचा उत्साह पाहिलाय
२००८मध्ये झालेल्या नाट्य संमेलनाला स्वत: राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील उपस्थित होत्या. त्याचे नियोजन, राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, हुतात्मा स्मृती मंदिरसारखे मोठे नाट्यगृह या सर्वाचे विस्मरण होणे नाही. त्यामुळे यंदाचेही संमेलनही यशस्वी होईल यात काही शंका नाही. डिसेंबरच्या अखेरीस तीन दिवसीय संमेलन पार पडण्याचे नियोजन आहे. उपनगरीयचे अध्यक्ष विजय साळुंखे त्यांचे सहकारी हे प्रचंड ऊर्जा असणारे असल्याने हे संमेलन यशस्वी पार पडेल यात काही शंका नाही.
- कोणताही कार्यक्रम होत असताना त्याला हजर असणारे रसिक महत्त्वाचे असतात. त्यांची साथ असल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. त्यामुळे सोलापूरसह राज्यातील सर्व नाट्य कलावंत रसिकांनी या संमेलनाचा आनंद घ्यावा, हे सांगणे आहे.
विजय साळुंखे, अभामना उपनगरीय शाखा