आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mohsin Shaikh News In Marathi, Divya Marathi, Solapur

मोहसीन शेख यांच्या कुटुंबाला लाखाची मदत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पुण्यामध्ये जमावाने केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले सोलापूरचे मोहसीन शेख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन काँग्रेसचे प्रवक्ते व खासदार हुसेन दलवाई यांनी सांत्वन केले. तसेच मौलाना आझाद विचार मंचच्या वतीने एक लाख रुपयांचा धनादेश कुटुंबीयांकडे सुपूर्द केला.
र्शी. दलवाई हे शनिवारी सोलापूर दौर्‍यावर आले होते. सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांनी मोहसीन शेख याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी दलवाई यांनी मोहसीन यांचे वडील सादिक शेख यांची विचारपूस करत त्यांना धीर दिला. या वेळी सादिक शेख यांनी ‘माझ्या मुलाचा नाहक बळी गेला, पोलिस पॉइंट जवळ असतानाही पोलिसांनी माझ्या मुलाला वाचवले नाही’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मुलाच्या अंत्यसंस्कारावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेतली, असे शेख म्हणाले.
भावाच्या शासकीय नोकरीसाठी प्रयत्न
मोहसीन हा कुटुंबाचा आधारस्तंभ होता. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचा आधारच गेला आहे. शेख कुटुंबीयांना साहाय्य करण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटून मोहसीन यांचे बंधू मुबिन शेख यांना शासकीय नोकरी देण्याची मागणी केली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी त्यांना वेळ दिली आहे. आमदार शिंदे या मुबीन शेख यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत.