आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोहसीन शेख आणि वसंत रूपनर कुटुंबीयांचे शिंदे यांच्याकडून सांत्वन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पुणे येथील हल्ल्यात मृत्यू झालेल्या मोहसीन शेख आणि दगडफेकीत जखमी झालेल्या वसंत रूपनर यांच्या कुटुंबीयांना शनिवारी भेटून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांत्वन केले. पोस्टल कॉलनी येथे मोहसीन शेख यांचे घर आहे. र्शी. शिंदे यांनी शनिवारी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोहसीन शेख यांची अंत्ययात्रा वेळेपूर्वी काढण्यात आल्याची माहिती या वेळी शिंदे यांना देण्यात आली. दगडफेकीमध्ये जखमी झालेल्या वसंत रूपनर यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. र्शी. शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. या वेळी माजी महापौर आरिफ शेख, स्थायी समिती सभापती बाबा मिस्त्री, माजी सभापती शिवलिंग कांबळे, कय्युम बुर्‍हाण उपस्थित होते.
शेख यांच्या कुटुंबीयांना 50 हजाराची मदत
अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलन समितीच्या वतीने मोहसीन शेख यांच्या कुटुंबीयांना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते 50 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या वेळी समितीचे अँड. यू. एन. बेरिया, अखलाख शेख, अ. कय्युम अलीम, शफी कॅप्टन, अश्पाक सातखेड उपस्थित होते