आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात मृगाचे आस्ते कदम !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गेल्या अनेक वर्षांपासून मृगाच्या पावसाचा पत्ताच लागत नव्हता. परंतु यंदा हे ‘मृग’जळ प्रत्यक्षात अवतरले. रविवारी शहर आणि परिसरात रात्री उशिरापर्यंत संततधार सुरूच होती. उत्तर दक्षिण सोलापूर, अक्कलकोट येथेही पाऊस होता. करमाळा, माढ्यातही रिमझिम सुरू होती. मंगळवेढ्यात मात्र जोरदार सरी कोसळल्या. रात्री साडेआठपर्यंत २.२ मिलिमीटर पावसाची नोंद हवामान खात्याने केली.

मोसमी पावसाने दमदार हजेरी लावली तरी ती सर्वदूर नव्हती. रविवारी मात्र हा पाऊस जिल्ह्याच्या सर्वदूर असल्याचे वृत्त आहे. शहरात सायंकाळी साडेपाचला पावसाच्या हलक्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. अधून-मधून त्याचा जोर होता.

रोहिणी नक्षत्रात तुरळक पाऊस झाला. त्यानंतर जूनपासून मृग नक्षत्रास सुरुवात झाली. तत्पूर्वी जूनलाच चांगला पाऊस झाला. त्यानंतर त्याची नियमित हजेरी आहे. रविवारी दुपारीच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाली. साडेपाचच्या सुमारास हलक्या सरी कोसळणे सुरू झाले. रात्रीपर्यंत संततधार सुरूच होती. त्यामुळे सखल भागात पाणी साचले. वाहनधारकांची तारांबळ उडाली.

उत्तरेच्या दिशेने : रविवारी नैऋत्य मौसमी पावसाची उत्तरीसीमा आणखी उत्तरेकडे सरकली. तो उत्तर अरबी समुद्र, गुजरात, छत्तीसगड, ओडिशा आणि वायव्य बंगालच्या उपसागरातील काही काही भाग, उर्वरित महाराष्ट्रात दाखल.