आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या बदलीच्या विरोधात सोलापूर बंदची हाक देत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात सुमारे दोन हजार जणांनी सहभाग घेत गुडेवार यांची बदली रद्द करण्याची मागणी करण्यात आली. तसेच, गुडेवार यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकार्‍याची बदली राजकीय सूडबुद्धीने करण्यात आली असून, मुख्यमंत्र्यांनी तत्काळ ही बदली रद्द करावी अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत जनता सत्ताधार्‍यांना त्यांची जागा दाखवून देईल,असा इशारा माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिला.

भाजप, शिवसेना आणि बसपच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. भाजप, शिवसेना व बसपच्या वतीने मेकॅनिकी चौकापासून मोर्चा काढण्यात आला. तर पूर्व भागातील दत्त चौकापासून माकप आणि शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. मेकॅनिक चौकापासून निघालेल्या मोर्चात आमदार विजयकुमार देशमुख, शिवसेना शहरप्रमुख प्रताप चव्हाण, बसपचे आनंद चंदनशिवे, प्रा. अशोक निंबर्गी, नगरसेविका नरसूबाई गदवालकर, श्रीकांचना यन्नम, नागेश वल्याळ, शशिकला बत्तूल, शिवसेनेचे भीमाशंकर म्हेत्रे, संतोष पाटील, रेवणसिद्ध बुक्कानुरे, युवा सेनेचे गणेश वानकर आदींचा सहभाग होता. दत्त चौकापासून निघालेल्या मोर्चात माजी आमदार नरसय्या आडम, नगरसेवक सुनंदा बल्ला, सिद्धप्पा कलशेट्टी, नसीमा शेख, शिवसेनेचे विष्णू कारमपुरी आदींचा सहभाग होता.जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर या मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. जाहीर सभेनंतर सर्वपक्षीय नेत्यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांची भेट घेऊन गुडेवारांची बदली रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन दिले.
आमदार माने यांनी ऐकले भाषण
गुडेवारांच्या बदलीपाठीमागे सत्ताधारी नेत्यांचा हात असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या जाहीर सभेतही विरोधकांनी सत्ताधार्‍यांना लक्ष्य केले. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या ब्रह्मदेवदादा माने बँकेच्या मुख्य शाखेत बसून काँगे्रसचे आमदार दिलीप माने हे मोर्चातील भाषणे ऐकत होते.

गुडेवार शासकीय निवासस्थानी
गुरुवारी शहरात बंद असताना पालिका आयुक्त गुडेवार आपल्या रेल्वे लाइन परिसरातील शासकीय निवासस्थानी होते. महापालिकेत न येता घरी बसूनच त्यांनी काही फायलींचा निपटारा केला.