आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • More State Transport Buses For Ashadi Ekadashi In Padharpur

आषाढी यात्रा : एसटीच्या 3,202 जादा गाड्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - आषाढी यात्रेसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाची शहरातील तिन्ही बसस्थानकांवरील तयारी अंतिम टप्प्यात आहे. संपूर्ण राज्यातून तीन हजार 202 जादा बसेस सोडणार असल्याची माहिती येथील विभागीय वाहतूक अधिकारी व्ही. के. हिप्परगावकर यांनी दिली.

आषाढी यात्रेसाठी राज्यासह शेजारच्या कर्नाटक, आंध्रप्रदेश व मध्यप्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक येथे येतात. रेल्वे, खासगी वाहनांच्या तुलनेने एसटी बसने येणा-या भाविकांची संख्या जास्त असते. त्यामुळे परिवहन महामंडळाने राज्यभरातून तीन हजार 202 जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यात्रेच्या काळात शहरात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी यंदाही बाजार समितीसमोरील तात्पुरत्या मुख्य चंद्रभागा बसस्थानकासह गावाबाहेर भीमा बसस्थानक (तीन रस्ता), सांगोला रस्त्यावर अन्य दोन बसस्थानके उभारली आहेत.

बसस्थानकांवरील व्यवस्था
चंद्रभागा, भीमा व सांगोला रस्त्यावरील बसस्थानकांवर सपाटीकरण, झुडुपांची तोडणी, स्वच्छता केली आहे. भाविकांसाठी निवारा शेड, प्रकाश व्यवस्था, तात्पुरती स्वच्छतागृहे, पाणीपुरवठा, प्रथमोपचार केंद्रे, उपहारगृहांच्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. यंदा प्रथमच चंद्रभागा व भीमा बसस्थानकावरही क्लॉकरुमची व्यवस्था केली आहे. भीमा व चंद्रभागा बसस्थानकावर गाड्यांच्या दुरुस्तीसाठी तात्पुरता यांत्रिकी विभाग, माहिती कक्ष उभारला आहे. तसेच तिन्ही बसस्थानकांवर पिण्याच्या पाण्याचे टँकर, प्रथमोपचार केंद्रे, रुग्णवाहिका, क्रेन, जनरेटरची सोय केली आहे.

प्रवाशांना मिळेल ही माहिती
या तिन्ही बसस्थानकांवर प्रवाशांच्या माहितीसाठी बसगाड्यांचे वेळापत्रक, माहिती पत्रक, संबंधित कार्यालयांचे दूरध्वनी क्रमांक, सोलापूर जिल्ह्यातील सर्व तीर्थक्षेत्रांची माहिती, तिकीट दर, एसटी महामंडळाच्या विविध योजनांची माहिती, पंढरपूर शहराचा संपूर्ण नकाशा, प्रवासी मार्गदर्शक डिजिटल फलक लावण्यात येतील.

तीन तात्पुरत्या बसस्थानकांची निर्मिती
विभागनिहाय गाड्या
अमरावती (489), औरंगाबाद (910), नागपूर (68), पुणे (775), नाशिक (810), मुंबई (250) अशा राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सहा विभागांतील गाड्यांचे नियोजन केले आहे. या शिवाय प्रवाशांची संख्या पाहून या विभागांमधून सुमारे 150 ते 200 गाड्या सोडण्याचे नियोजन आहे.

कोठे कोणत्या गाड्या थांबतील याचेही नियोजन
भीमा बसस्थानक : अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, अमरावती, अकोला, बुलडाणा, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, नांदेड, जालना.
चंद्रभागा बसस्थानक : पुणे, सातारा, मुंबई, ठाणे, रायगड, सांगली, कोल्हापूर.

सांगोला रोड बसस्थानक
कर्नाटक राज्यातील सर्व गाड्या. सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर व पंढरपूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील कासेगाव, सरकोली, ओझेवाडी, चळे, आंबे आदी गाड्या