आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्तनपान शिशूंसाठी सर्वोत्तम आहार: मदर मिल्क बँक सोलापुरात कधी?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- मातेच्या दुधापासून वंचित असलेल्या अनेक बाळांना दूध देण्यासाठी पुणे, मुंबईसह राज्यातील विविध शहरांमध्ये मदर मिल्क बँक कार्यरत आहेत. आज सोलापुरात 30 टक्के बालके ही आपल्या आईच्या दुधापासून वंचित आहेत. सोलापुरात मदर मिल्क बँक तयार झाली तर वंचित असलेल्या त्या 30 टक्के बाळांना मातेचे दूध मिळू शकणार आहे.

सहा महिने संग्रहित राहते दूध
मदर मिल्क बँकेत संरक्षित केलेले दूध हे सहा महिने उत्तम राहते. त्यातून अडचणीच्या वेळी शहरातील विविध रुग्णालयांतील बालकांना दूध देणे कधीही शक्य होईल. 20 डीग्री तापमानावर टिकणारे दूध मातेकडून आल्यानंतर जितके ताजे असते तितकेच ताजे असते. त्यामुळे मदर मिल्क बँकेची गरज सोलापूरच्या मेडिकल हब म्हणविल्या जाणार्‍या शहराला नक्कीच हवी.

बाळाला गरज
आताच्या मातांमध्ये दूध नसल्याची ओरड जास्त आहे. त्यामुळे मुले बर्‍याचदा आईच्या दुधापासून वंचित राहतात. मदर मिल्क बँक उभी राहिली तर माता व बाळासाठी उत्तम होईल. पोषण चांगले होईल.
- विद्या देशपांडे, बालरोग तज्ज्ञ

हे होतील फायदे
>बाळांना कुपोषण, न्यूमोनिया, बालदमा, अतिसार असे आजार होण्यापासून थांबू शकतात.
>पावडरचे दूध पिऊन दिवस काढावे लागतात, त्यांना मातेच्या दुधाची चव मिळेल.
>बाळाला वारंवार कोणतेही आजार होणार नाहीत.

खूप गरज आहे
मेडिकल हब म्हणवल्या जाणार्‍या सोलापूरला मदर मिल्क बँकेची खूप गरज आहे. प्रतिकार शक्ती कमी असणार्‍या बाळांना मदर मिल्क बँकेच्या मदतीने दूध मिळाले तर त्याचा 100 टक्के उपयोग होईल.
-शैलेश पाटील, स्त्रीरोग तज्ज्ञ

मदर मिल्क बँक का आवश्यक ?
जुळी किंवा तिळी मुले असून तिच्यात भरपूर दुधाची क्षमता नसेल तर तिला लाभ.
जन्म दिल्यानंतर लगेचच माता दगावते. अशा बाळांना मदर मिल्क बँकेतून दूध देणे शक्य होते.
असाध्य रोगामुळे ती बाळाला दूध पाजू शकत नसेल, तर त्यावेळी मदर मिल्क बँकेची मदत होईल.

उदयपूर येथे झाली बँक
उदयपूर येथे ‘दिव्य भास्कर’च्या प्रयत्नाने सतत 7 दिवस अभियान हाती घेऊन शासकीय स्तरावरून मदर मिल्क बँकेची उभारणी करण्यात आली. आज ही बँक अनेक वंचित बालकांना दूध देण्याचे काम करत आहे. अनेक बाळांचा दुवा घेत आहे.

> ज्या मातेला भरपूर दूध आहे, ती आपले दूध काढून टाकण्याऐवजी त्याची साठवण मदर मिल्क बँके त करू शकते.
>ज्या मातेला दूध येत नाही अशी माता मदर मिल्क बँकेतून बाळाला दूध देऊ शकते.
>अनाथ बालकांना मदर मिल्क बँकेतून सोय होईल.