आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्‍तनपानाचे प्रमाण घटले, सोलापुरातील 30% बालके आईच्या दुधापासून वंचित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - जन्मलेल्या बाळाची पोषकता व दीर्घायुष्यासाठी मातेचे दूध अमृत धनच असते. मात्र सोलापूर शहर व जिल्ह्यातील 30 टक्के माता या-ना त्या कारणावरून आपल्या शिशूला अमृतासमान असलेले दूध देऊ शकत नसल्याची चिंताजनक माहिती जिल्हा परिषद संधोशन अभ्यास गटाच्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

(या दुधामुळे, मुलांना नपुंसकत्वाचा तर मुलींना लवकर वयात येण्याचा धोका)

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, बाळ जन्मल्यानंतर पहिल्या एक तासापासून ते सहा महिन्यांचे होईपर्यंत आईच्या स्तनपानावर वाढले पाहिजे. त्यानंतर पुढील निदान दोन वर्षांपर्यंत आईच्या दुधासोबत पूरक व पोषक अन्न त्याला मिळायला हवे, तरच त्यांची वाढ योग्यरीत्या होऊ शकते. मात्र याचे प्रमाण वरचेवर घटत चालले आहे.

मातांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. त्यानिमित्ताने ‘दिव्य मराठी’ने जागर मोहीम हाती घेतली आहे.