आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mothers Brestfeeding Milk Is Good For Child Health

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाळाला दूध पाजणे जमत नसेल तर आई होण्याचा अधिकार नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - केवळ आपल्याला कुणी वांझ म्हणू नये म्हणून बाळाला जन्म देणार्‍या मातांचे प्रमाण वाढत आहे. करिअरच्या मागे धावणार्‍या महिलांचा विचार केला तर आई होणे सोपे, मात्र आई झाल्यानंतर आईपण निभावणे खूप अवघड असते, असे परखड मत जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. निशिगंधा माळी यांनी व्यक्त केले. ‘दिव्य मराठी’ने अयोजित केलेल्या स्तनपान सप्ताहानिमित्त ‘टॉक शो’मध्ये त्या बोलत होत्या. बाळाला जन्म दिल्यानंतर त्याच्या योग्य वयापर्यंत दूध देणे मातेचे परमकर्तव्य असते. ते आईला जमत नसेल तर बाळाला जन्म देण्याचा तिला अधिकारच नाही, असे परखड विचार डॉ. माळी यांनी व्यक्त केले. करिअरमागे धावणार्‍या महिला काही समजुती बाळगून असतात. त्यामुळे बाळाला दुधापासून दूर ठेवण्यात येते. परिणामी बाळ प्रतिकारशक्ती वाढवणार्‍या पोषक दुधापासून वंचित राहते. हे मातांनी समजून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी ‘टॉक शो’मध्ये सांगितले.

उच्च शिक्षित वर्गातच गैरसमज आहेत. बाळाला दूध पाजल्याने ‘फिगर’ बिघडते अशी अंधर्शद्धा शिकलेल्या महिलांमध्येच आहे. मातेने स्तनपान करणे बाळासाठी आणि आईसाठीही फायद्याचे असते, हे सुशिक्षित महिलांना सांगण्याची गरज आहे. झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करणे अवघड असते, अशी म्हण आहे. ती सुशिक्षित वर्गाला लागू होते. प्राणीही आपले कर्तव्य चुकत नाहीत तर बुद्धिमान समजले जाणार्‍या मानवाने असे का वागावे? तंत्रज्ञानाने एवढे पुढे गेलेला माणूस पुन्हा आपल्या अविचारामुळे मागे येऊ नये असे वाटते. सारासार विचार करून जीवन जगल्यास समस्या निर्माण होणार नाहीत.

‘आम्ही दोघे राजाराणी’चा धोका
पूर्वीच्या काळी घरी आई, आजी, मामी, काकू असायच्या. बाळंतपणाच्या वेळी त्यांच्याकडून मातेचे कर्तव्य, आहार आदींविषयी योग्य माहिती मिळण्याची सोय होती. आता अनुभवाच्या गोष्टी सांगण्यासाठी घरी कोणीच नाही. झाकरीतलं दूध दे किंवा देऊ नको हे सांगायला मायेचं कोणीच नाही. करिअर ओरिएंटेड माता म्हणते, फिगर मेंटेन करायचे असल्याने स्तनपान करणे चुकीचे आहे. आताच्या माताना तथाकथित सौंदर्य आणि करिअर महत्त्वाचे वाटत आहे. जिव्हाळा, विश्वास, नि:स्वार्थी प्रेम हे आईकडे असते. तीच स्वार्थी झाली तर मानवाने आशेने पाहायचे कोणाकडे?

स्तनपान शिशूंसाठी सर्वोत्तम आहार
बाळासाठी मातेचे दूध हे सर्वोत्तम असते. परंतु अनेक कारणामुळे स्तनपान करणे टाळले जाते. असे करणे अवैज्ञानिक आहे. - डॉ. निशिगंधा माळी, अध्यक्ष, जिल्हा परिषद