आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकांकडून मिरवणूक; मनपाकडून उपेक्षा, गिर्यारोहक आनंद बनसोडे याचे जल्लोषात स्वागत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - युरोपातील सर्वोच्च शिखर एल्ब्रुसवर यशस्वी चढाई करून गुरुवारी सकाळी शताब्दी एक्सप्रेसने आलेल्या आनंदचे रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत करत विजयी मिरवणूक काढण्यात आली. परंतु, सोलापूर महापालिकेकडून मात्र या विजयी वीराची दखल घेण्यात आली नाही. मोहिमेत आनंदसोबत हरियानाचा रामलाल शर्मा हा तरुण होता. त्यामुळे हरियानाच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्ली विमानतळावर शासकीय गाडी पाठवून त्याचे स्वागत केले. पण, सोलापुरात मात्र आनंदची मनपाने उपेक्षा केली.

आई पार्वती यांनी सर्वप्रथम औक्षण केले तेव्हा त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. वडील अशोक बनसोडे, परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. आनंदच्या मित्रपरिवाराने मिरवणूक काढली. सजवलेल्या रथात आनंद आणि त्याचे आई वडील हातात तिरंगा घेऊन विराजमान झाले. श्राविका कनिष्ठ महाविद्यालय, निर्मलाताई ठोकळ प्रशाला आणि पंचशील प्रशालेतील विद्यार्थ्यांची पथके झांज आणि लेझीमसह मिरवणुकीत सहभागी झाले होते. सात रस्ता मार्गे कुमठा नाका येथे आनंदच्या निवासस्थानापर्यंत मिरवणूक निघाली. गुलाबांच्या पाकळ्या, पुष्पगुच्छ, फेटे बांधून ठिकठिकाणी स्वागत झाले.