आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mountaineer Enjoy Bansode,Latest News In Divya Marathi

गिर्यारोहक आनंद बनसोडे दिल्लीला रवाना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- युरोपातील माउंट एल्ब्रुस मोहिमेसाठी सोलापूरचा एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे रविवारी कर्नाटक एक्स्प्रेसने दिल्लीला रवाना झाला. तेथून मॉस्कोला रवाना होत तो शिखर चढाई मोहिमेस प्रारंभ करेल. यानिमित्त सोलापुरातील विविध सामाजिक संघटनांनी रेल्वे स्थानकावर येऊन आनंदला शुभेच्छा दिल्या.
2012 मध्ये आनंदने एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर सर केले होते. यानंतर आता उर्वरित खंडांतील एकूण सहा सर्वोच्च शिखरे सर केल्यानंतर सेवन समीट्स मोहीम पूर्ण करणार्‍या निवडक भारतीयांमध्ये त्याचा समावेश होईल. या वेळी आनंदचे वडील अशोक, आई पार्वती यांच्यासह जिल्हा परिषदेचे शाखा अभियंते राजेश जगताप, अमोल मोहिते, अभिजित भडंगे, राज सलगर, गुरुशांत धुत्तरगावकर, सिद्धेश्वर घोडगे, राजेश संगा, सोनू स्वामी आदी उपस्थित होते.
सोनियाकडून सात शिखरांचे स्वप्न चित्रबद्ध
दहावीतील सोनिया पराग या विद्यार्थिनीने सात शिखरांच्या मोहिमेपासून प्रेरित होऊन थ्रीडी चित्र रेखाटले. हेच चित्र एव्हरेस्टवीर आनंदला देऊन त्याच्या स्वप्नाला शुभेच्छाही दिल्या. या चित्रात सातही खंडांतील सवरेच शिखरे रेखाटली आहेत. त्यांना कवेत घेणारा एव्हरेस्टवीरही दर्शवला आहे. रेल्वे स्थानकावर एव्हरेस्टवीर आनंदला माउंट एल्ब्रुस मोहिमेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.