आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन-बार्शी नाका तात्पुरता टोलमुक्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरातील रस्ते खराब झालेले असतानाही टोलची आकारणी करण्यात येत असल्याने बहुजन समाज पार्टीने बुधवारी बार्शी टोल नाक्यावर आंदोलन केले. टोल फ्री आंदोलन होणार असल्याने बार्शी रस्त्यावरील टोल नाका सकाळपासून बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे या रस्त्यावरील चार चाकी वाहनांनी दुपारपर्यंत टोलमुक्ती अनुभवली. रस्ते खराब असल्याने टोल भरू नका, असे आवाहन आंदोलनकर्त्यांनी वाहनधारकांना केले. बसपाचे आंदोलन दीड तास सुरू होते. यावेळी कंमाडोसह सशस्त्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

राज्य शासनाचा धिक्कार

नगरसेवक आनंद चंदनशिवे, नगरसेविका सुनीता भोसले यांच्यासह सुमारे 150 कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. ‘सक्तीने टोल वसुली करणार्‍या शासनाचा धिक्कार असो,’ ‘बंद करा, बंद करा टोल वसुली बंद करा’ आदी घोषणा यावेळी देण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश सोनकवडे, पोलिस निरीक्षक यादव यांच्यासह सुमारे दीडशे पोलिसांचा बंदोबस्त होता.

मक्तेदारांनी केला पत्रव्यवहार

खराब रस्त्यामुळे वाहनांचे नुकसान तर होतेच. शिवाय अपघाताची शक्यता वाढते. रस्ता दुरुस्त करण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे आणि वसुली करताना अडचण होत आहे. त्यामुळे तत्काळ रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी मक्तेदारांनी 18 नोव्हेंबर 2013 आणि 16 जानेवारी 2014 रोजी एमएसआरडीसीकडे पत्र पाठवून केली. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही.


जिझीया कराची आकारणी सुरू

वाहन घेताना रोड टॅक्स भरायचा, त्यानंतर टोल भरायचा. खराब रस्ते असताना दोन वेळा रक्कम द्यावे लागते. एक प्रकारे जिझीया कराची आकारणी सुरू आहे. खराब रस्त्यांसाठी आम्ही टोल देणार नाही. आठ दिवसांत शहरातील टोल संदर्भात शासनाने निर्णय घ्यावा, अन्यथा पुन्हा अक्कलकोट रोडवरील टोल नाक्यावर आंदोलन करणार आहे. आनंद चंदनशिवे, नगरसेवक