आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MP Asaduddina Owais,latest News In Divya Marathi

मुस्लिम, दलित, धनगर समाजाच्या हक्कासाठी लढा,एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने साठ वर्षांत आपल्याकडून मते घेतली, बदल्यात काहीच दिले नाही. आम्हाला गरीबच ठेवले. आमच्या गरजा पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे मुस्लिम, दलित, धनगर समाजाला न्याय मिळावा. त्यांच्या हक्कासाठी आपण लढत राहू असा इशारा ऑल इंडिया मजलीस इत्तेहदुअल मुस्लिमीन (एमआयएम)चे अध्यक्ष तथा हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी येथे बोलताना दिला. शुक्रवारी रात्री होम मैदानावर विधानसभा निवडणुकीसाठी त्यांची जाहीर सभा झाली. आपल्या एक तासाच्या भाषणात विकासाचे मुद्दे, राज्यातील राजकीय नेत्यांनी मुस्लिम समाजाचा मतासाठी कसा वापर करून घेतला, समाजाच्या विकासऐवजी स्वत:चा विकास करून घेतला. मुस्लिम समाजाला काहीच दिले नाही या विविध मुद्यांवर अभ्यासपूर्ण मुद्दे मांडले. यावेळी आमदार मुमताज अहमद खान, तौफीक शेख, अर्जुन सलगर आदी मान्यवर उपस्थित होते. समीउल्ला शेख यांनी शेख यांना जाहीर पाठिंबा दिला.
काँग्रेसला पराभव दिसतोय
पंधरावर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीने विकासाच्या मुद्द्यावर काय दिले, त्यांना आता पराभव स्पष्ट दिसतो आहे, राज्यात फक्त टोल नाके आहेत. गरीब वस्ती, झोपडपट्टींमध्ये रस्ते, पाणी, सार्वजनिक स्वच्छता नाही. कोणता विकास केला? लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीचे पानिपत झाले. कारण, दलित, धनगर, मुस्लिम एकत्र आला. आता विधानसभेतही आपल्या प्रतिनिधी गेलाच पाहिजे, असे मत एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी होम मैदान येथील जाहीर सभेत व्यक्त केले.
चौदाशेवर्षापूर्वीच स्वच्छतेचे महत्त्व
ओवेसीम्हणाले, पंतप्रधान नरेंद्ग मोदी स्वच्छेतेचे महत्त्व आता सांगताहेत. चौदाशे वर्षापूर्वीच याचे महत्व पटवून देण्यात आले. टीव्हीवर दिसण्यासाठी हातात झाडू घेऊ नका. झोपडपट्टीत जाऊन स्वच्छता करा. शौचालय, गटार योजना, पक्के रस्ते बांधा, ती खरी स्वच्छता आहे.’
निवडणुकीच्या निमित्ताने भाजप, कॉग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना या पक्षाचे अनेक नेते येऊन गेले. भाषण केले, रॅली काढली. त्यांना नोटीस कलम (१४४) प्रमाणे का दिल्या नाहीत. मलाच का नोटीस दिली. याचा खरपूस समाचार घेताना खासदार ओवेसी यांनी काही मुद्दे उपस्थित केले. आमच्यावरच संशय पोलिस आयुक्त, सहायक आयुक्तांनी का घ्यावा. आम्ही गद्दार नाही. या हिंदुस्थानावर प्रेम करणारे आहोत. कायदा पाळणारे त्या चौकटीत राहणारे आहोत. लोकशाहीत सर्वांना बोलण्याचा, मत मांडण्याचा अधिकार आहे. हा हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही का? खुले आणि भयमुक्त वातावरणात निवडणूका व्हाव्यात. अशी दडपशाही पोलिसांनी आमच्यावर लादू नये. राज्यात कुठेही गेलो की पहिल्यांदा नोटीस दिली जाते, असे ते म्हणाले.

290 आमदार का नाही झाले
१९६२-२००९या कालावधीत तीन हजार १०८ आमदार झाले. त्यात ११९ मुस्लिम समाजाचे आमदार झाले. मुस्लिमांची लोकसंख्या पाहता २९० आमदार पाहिजेत. २८८ मतदार संघात भाजपने दोन, शिवसेना एक, मनसे सात, कॉग्रेस१९ , राष्ट्रवादी १६ उमेदवार दिले आहेत. दीड कोटी लोकसंख्येच्या मानात काँग्रेसने ३० आमदार का दिले नाहीत, असा प्रश्न ओवीसी यांनी विचारला.
धनगर समाजाला एसटीमध्ये सामावून का घेत नाहीतपथकाने नेले ते निष्पाप आहेत
सेना-भाजप यांची पंचवीस वर्षाची मैत्री तुटली; आता फक्त बायबाय-
सर्वच पक्षांना राज्यात फक्त खाण्यासाठी (गुलाब जामून) सत्ता पाहिजे
मुस्लिमांना बँक लोन मिळत नाही; साठे टक्के लोक दारि रेषेखाली आहेत
पंतप्रधानांनी आपल्या समाजाबद्दल सर्टिफिकेट देण्याची गरज नाही;
आम्ही भारतीय आहोत, भारताकडे कुणी डोळे वटारून पाहिले तर त्यांना तसेच उत्तर देऊ