पंढरपूर- काँग्रेसचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचार सभेसाठी शनिवारी येथे आलेले स्टार प्रचारक खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांचे हेलिकॉप्टर पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरसाठी बनवलेल्या हेलिपॅडवर उतरवावे लागले. या घोळामुळे शिंदे यांना विरोधी उमेदवार प्रशांत परिचारक यांचे सहकार्य घ्यावे लागले. श्री विठ्ठल - रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी शिंदे सरकार वाड्याला भेट दिली आणि भालके यांच्यासाठी सभा घेताच ते पुढे रवाना झाले.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भालके यांच्या प्रचारार्थ सकाळी 11 वाजता येथील तनपुरे महाराज मठात माजी केंद्रीय मंत्री शिंदे यांच्या सभेचे आयोजन केले होते. त्यासाठी भालके यांनी जय्यत तयारी केलेली होती. वाहनांवरील स्पिकर,
मोबाइल एसएमएस या माध्यमातून वातावरण िनर्मिती केली होती. काँग्रेसकडून स्टार प्रचारकाची येथे ही पहिलीच सभा होती. खासदार शिंदे यांचे हेलिकॉप्टर कोर्टी रस्त्यावरील कृषी खात्याच्या रोपवाटिकेजवळील हेलिपॅडवर उतरवण्याची व्यवस्था केली होती. तेथे भालके यांच्यासह कार्यकर्ते त्यांच्या प्रतीक्षेत होते.
दरम्यान,
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी सभेसाठी येणार असल्याने त्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी रेल्वे मैदानावर व्यवस्था केली आहे. भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार प्रशांत परिचारक हे त्याची पाहणी करत होते. त्याचवेळी अचानक शिंदे यांचे हेलिकॉप्टर त्याठिकाणी उतरले. ते पाहून भंडारी परिचारक हेही बुचकळ्यात पडले. हेलिकॉप्टरमधून शिंदे हे उतरताच परिचारक भंडारी हे त्यांना सामोरे जात त्यांची विचारपूस केली. त्यांनी त्यांचे हेलिकॉप्टर चुकीच्या हेलिपॅडवर उतरल्याची कल्पना दिली. तसेच भंडारी यांनी परिचारक हे भाजप महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी हे उद्या येथे येणार असल्याचे सांगितले.
शिंदे यांनी परिचारक यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देत श्री विठ्ठल दर्शनासाठी मंदिरात जाण्यासाठी व्यवस्था करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर परिचारक यांनी त्यांची व्यवस्था केली. त्यांचे कार्यकर्ते संदीप तापडिया यांच्या कारमधून शिंदे त्यांच्यासोबतचे पदाधिकारी विठ्ठल मंदिराकडे रवाना झाले. ते दर्शनासाठी विठ्ठल मंदिरात गेल्याची माहिती मिळाल्यानंतर भालके त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीचा ताफा तिकडे वळला. भालके त्यांची भेट झाली. मात्र, रस्त्यावरच असलेल्या सभास्थानी जाता शिंदे यांनी पुन्हा तापडिया यांच्या गाडीतून महाद्वार घाटावरील
आपल्या शिंदे सरकार वाड्याला भेट दिल्यानंतर पुढे जाणे पसंद केले.
ही सभा पूर्वनियोजित नव्हती, होती बैठक
खासदार शिंदे यांची सभा पूर्वनियोजित नव्हती. दरम्यान, आम्ही कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. ते देवदर्शनासाठी पंढरपुरात आले होते. वेळ मिळाल्यास बैठकीला उपस्थित राहण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती. त्यांना सभेसाठी लातूरला जावयाचे असल्याने ते बैठकीला येऊ शकले नाहीत.'' आमदारभारत भालके, उमेदवार,काँग्रेस