आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार मोहिते दिसताहेत केवळ माळशिरसमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे केंद्रीय गृहमंत्र्यांचा पराभव करून भाजपकडून विजय संपादन केलेले खासदार अॅड. शरद बनसोडे यांनी आतापर्यंत ग्रामीण भागात विशेषत: अक्कलकोट मतदार संघावर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, मोहोळ, दक्षिण सोलापूर, शहर मध्य या भागात ते प्रचारात सक्रिय दिसून आलेले नाहीत. यापुढील काळात शहरात आणि केंद्रीय नेत्याबरोबर प्रचारात सहभागी होणार असल्याचे श्री. बनसोडे यांनी सांगितले.
बनसोडे यांना सहा विधानसभा मतदार संघांपैकी शहर उत्तरमध्ये सर्वाधिक म्हणजे 41 हजार मताची आघाडी त्यांना मिळाली होती. सहा मतदारसंघापैकी पंढरपूर-मंगळवेढ्याची जागा स्वाभिमानी संघटना तर अक्कलकोट, मोहोळ, शहर उत्तर, शहर मध्य आणि दक्षिण सोलापूरच्या जागेवर भाजपचे उमेदवार आहेत. श्री. बनसोडे यांनी अक्कलकोट येथे सर्वाधिक काॅर्नर सभा घेतल्या आहेत तर शहर उत्तरमध्ये काही प्रमाणात पदयात्रा घेतल्या. उर्वरित तीन मतदार संघांत यापुढील काळात ते जाणार आहेत. दक्षिण विधानसभा मतदार संघातील प्रचारासाठी खासदार बनसोडे अद्याप गेले नाहीत.

आजपासून शहरात असेन
मीअक्कलकोट येथील प्रचार संपवला असून, आजपासून शहर उत्तर, मध्य आणि दक्षिण सोलापुरात फिरणार आहे. केंद्रीय नेत्याची सभा आजपासून सुरू होत असल्याने त्यांच्यासोबत राहणार आहे. - खा. अॅड. शरद बनसोडे