आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आराखड्यात त्रुटी, सुधारणेच्या सूचना, अकलूज येथे मोहिते यांनी घेतली बैठक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकलूज- श्री संत ज्ञानेश्वर श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्ग पालखी तळाच्या विकास आराखड्यात त्रुटी असल्याचे अर्थ नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी मान्य केले आहे. तसेच त्यांनी या आराखड्यात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पालखी मार्गावरील गावांकडून सूचना मागण्या मागितल्या असल्याची माहिती खासदार िवजयसिंह मोहिते यांनी ली. शनिवारी (दि. २७) खासदार मोहिते यांनी यासंदर्भात पदाधिकारी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या वेळी ते बोलत होते. तसेच पुढील २० वर्षांचा विचार करून हा आराखडा व्हावा, असे त्यांनी म्हटले.
पुणे येथील विभागीय आयुक्तालयाच्या देहू, आळंदी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास शाखेने दोन्ही संतांच्या पालखी मार्ग आणि पालखी तळाच्या विकासासाठी आराखडा तयार केला होता. त्यासंदर्भात बुधवारी (दि. २४)अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंुबईत बैठक घेतली. त्यावेळी खासदार मोहिते यांनी या आराखड्यातील त्रुटी त्यांच्या नर्शनास आणून दिल्या होत्या. त्या मान्य करत सुधारित आराखडा तयार करण्याच्या त्यांनी सूचना ल्याचे त्यांनी सांिगतले.
सध्याच्या आराखड्यातील निधी तरतूद : या आराखड्यात सोलापूरसाठी संत तुकोबांच्या पालखी तळ विसावा ठिकाणासाठी सहा कोटी ५० लाखांची शिफारस केली आहे. यात अकलूज कोटी, माळीनगर ५० लाख, बोरगाव कोटी पिराची कुरोलीसाठी कोटी आहे. संत ज्ञानेश्वरांच्या पालखी तळ विसाव्यासाठी १४ कोटींच्या निधीची शिफारस केली आहे. यात नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगावसाठी प्रत्येकी दोन कोटी तर वाखरी चार कोटी, सदाशिवनगर, खुडूस फाटा, ठाकूरबुवा समाधाी बाजीराव विहीर या रिंगण सोहळा ठिकाणांसाठी प्रत्येकी ५० लाखांची शिफारस आहे. यात वाढीची खासदार मोहिते यांची मागणी आहे.
दोन वसांत नीरा कालव्यात पाणी
पालखी सोहळ्यावेळी नीरा कालव्यातून पाणी सोडण्याची सूचना खासदार मोहिते यांनी दिली. अधीक्षक अभियंता कपोले यांनी दिवसांत पाणी सोडू, असे सांिगतले.
पंढरपुरात होणार बैठक
या आराखड्यासंदर्भात निर्णयासाठी अर्थमंत्री मुनगंटीवार लवकरच पंढरपूर येथे बैठक घेणार आहेत. त्यापूर्वी अहवाल तयार करण्याचा सूचना खासदार मोहिते यांनी ग्रामपंचायती पदाधिका-यांना दिल्या.
बातम्या आणखी आहेत...