आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रश्न विचारण्यात टॉप खासदारांत मोहिते पाचवे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकलूज - १६व्या लोकसभेला १६ मे रोजी एक वर्ष पूर्ण झाले. लोकसभा अधिवेशन कालावधीत वर्षात विविध तारांकित प्रश्न उपस्थित करणाऱ्या देशातील टॉप सात खासदारांत माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते यांचा पाचवा क्रमांक आहे. पीआरएस इंडिया संस्थेने क्रमवारी जाहीर केली आहे.
पीआरएस इंडिया संस्थेने गत वर्षीच्या संसद कामकाजाचा आढावा सर्वेक्षण जाहीर केले आहे. वर्षात सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणाऱ्या खासदारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये खासदार मोहिते यांचा पाचवा क्रमांक आहे. खासदार मोहिते प्रथमच लोकसभेत गेले आहेत. परंतु त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात गेले ४४ वर्षे भरीव योगदान दिले. त्यामुळे त्यांच्या पाठीशी विकासकामांचा दांडगा अनुभव आहे. त्याची चुणूक त्यांनी लोकसभेत दाखवली आहे. त्यांनी खासदारकीच्या एक वर्षाच्या कालावधीत राज्य देशपातळीवरचे तब्बल २७४ प्रश्न लोकसभेत मांडले आहेत. त्याशिवाय विविध प्रश्न समस्यांवर तोडगा काढण्यासाठी अनेक बैठका संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन ते वर्षभर सतत चर्चेत राहिले आहेत.

टॉप सात खासदार
>शिवाजीराव आढळराव-पाटील(शिरूर) शिवसेना : ३१५ प्रश्न >श्रीरंग बारणे(मावळ), शिवसेना : ३१४ प्रश्न >सुप्रियासुळे(बारामती), राष्ट्रवादी : २९१ प्रश्न >धनंजय महाडिक(कोल्हापूर), राष्ट्रवादी : २८२ प्रश्न >विजयसिंहमोहिते(माढा), राष्ट्रवादी : २७४ प्रश्न >धमेंद्र यादव(बहायूँ यू. पी.) पा : २६४ प्रश्न >राजीव सातव(हिंगोली), काँग्रेस : २६६ प्रश्न
बातम्या आणखी आहेत...