आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खासदार बनसोडे यांनी घेतली सुशीलकुमार शिंदेंची भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूरचे नूतन खासदार शरद बनसोडे यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची शुक्रवारी सायंकाळी ‘जनवात्सल्य’वर जाऊन भेट घेतली. भेटीतील अधिकचा तपशील मिळाला नसला तरी विकासासंदर्भातील मुद्दय़ांवर दोन नेत्यांमधील पहिल्याच भेटीत चर्चा झाली. पक्षीय मतभेद बाजूला ठेवून शहर विकासासाठी मार्गदर्शन घेऊ, असे बनसोडे यांनी सांगितले.
निवडणूक निकालानंतर खासदार बनसोडे यांनी जाहीरपणे शिंदे यांच्या भेटीबाबत सूतोवाच केले होते. तेव्हापासून सर्वांनाच उत्सुकता होती. शिंदे यांच्या सात रस्ता येथील जनवात्सल्य या बंगल्यावर बनसोडे यांनी शिंदेंची भेट घेतली. शिंदे यांनीही त्यांचे मनोमन स्वागत केले. वीस-पंचवीस मिनिटांच्या गप्पांमध्ये शिंदे यांनी जुन्या राजकीय आठवणी सांगितल्या. खासदार बनसोडे यांना प्रवेशद्वारापर्यंत येऊन निरोप दिला.

गेल्या 40 वर्षांपासूनचा शिंदे यांचा राजकीय अनुभव आहे, त्याचा उपयोग मला होईल. मतदारसंघातील कामाबद्दल त्यांचे मार्गदर्शन घेतले. केंद्र सरकारमार्फत सोलापुरात सुरू असलेली व प्रशासकीयस्तरावर प्रलंबित कामाची माहिती जाणून घेतली. ती कामे गतीने पुढे नेण्याचा माझा प्रयत्न असेल. पंढरपूर-विजापूर रेल्वेमार्ग, बोरामणी विमानतळासाठी अंदाजपत्रकात भरीव तरतूद करण्यासाठी संबंधितांना भेटून निवेदन सादर करणार असल्याचे बनसोडे यांनी भेटीनंतर पत्रकारांना सांगितले.
बाबासाहेबांमुळे संधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आम्ही मोठे झालो हे शिंदे यांनी सांगितले, ते बरोबरच आहे. त्यांच्यामुळेच आम्हाला पदे मिळाली आहेत, हे कधीही विसरणार नाही, असे बनसोडे यांनी सांगितले.
मुख्यमंत्रिपदाला नकार
शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे, त्यांना शुभेच्छा दिल्या का? या पत्रकारांच्या प्रश्नावर बनसोडे म्हणाले, शिंदे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारणार नाही, असे आपणास चर्चेत सांगितले.

शरदाचे ‘सुशील’ स्वागत
लोकसभा निवडणूक मोदी लाटेमुळे गाजली तशी ती मातब्बरांच्या दारुण पराभवामुळेही. सुशीलकुमार शिंदेंचा बालेकिल्ला बळकावणारे नूतन खासदार शरद बनसोडे यांनी शिंदे यांची त्यांच्या निवसस्थानी जाऊन भेट घेतली.