आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार मोहितेंकडून महावितरणचा "हिशेब', कामे वेळेत पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शासनाकडून मुबलक निधी मिळूनही अत्यावश्यक सेवा पुरवण्यात महावितरण अयशस्वी ठरली आहे. एक-एक वर्ष कामे पूर्ण होत नाहीत, एकाच कामासाठी वारंवार प्रस्ताव द्यावा लागतो, शासनाने ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले जात नाही, अशा शब्दांमध्ये खासदार विजयसिंह मोहिते आमदार दिलीप सोपल यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फटकारले. पुढील बैठकीस येताना पूर्ण कामांची माहिती संपूर्ण आकडेवारी आणण्याच्या सूचनाही खासदार मोहिते यांनी केल्या.
सोपलांकडून कान उघडणी...

ग्रामज्योती योजनेचा आढावा सुरू असताना आमदार दिलीप सोपल यांनी महावितरण अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. ग्रामीण घरगुती वीज जोडणीमध्ये दिलेली आकडेवारी शंकास्पद आहे, याचा अभ्यास करून माहिती देत जा, वितरण रोहित्रे, लघुदाब वाहिनी, ११ केव्ही वाहिनीची कामे मंजूर होऊनही पूर्ण होत नाही.

अनेक तालुक्यात निधी जागा उपलब्ध होऊनही कामे पूर्ण होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. महावितरणची कामे होत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत, प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. विद्युत प्रणालीचे बळकटीकरण करण्यातही महावितरणला यश आले नाही, यामुळे पुढील काळात शासनाच्या योजनेनुसार अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी कालावधी निश्चित करावा, तसे आदेश प्रत्येक तालुकास्तरीय अधिकारी यांना द्यावेत, अशा सूचना खासदार मोहिते यांनी दिल्या.

ग्रामज्योती योजनेचा आढावा

शासकीय विश्रामगृहावर खासदार विजयसिंह मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामज्योती योजना आयपीडीएस योजनेची बैठक पार पडली. बैठकीस आमदार दिलीप सोपल, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, आमदार हनुमंत डोळस, महावितरण सोलापूरचे अधीक्षक अभियंता संजय साळे यांच्यासह तालुक्याचे अधिकारी उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. अकृषिक ग्राहकांना २४ तास वीज उपलब्ध करणे, वितरण प्रणाली बळकट करणे, राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेची अंमलबजावणी याविषयी अभियंता साळे यांनी माहिती दिली.

नगरपालिकांना २६ कोटी...

सोलापूर महापालिकेसह नगरपालिका क्षेत्रामध्ये महावितरणची कामे करण्यासाठी २६ कोटी रुपयांचा निधी आहे. यातून सोलापूर शहरातील कामे पूर्ण होणार नाहीत. यामुळे हा निधी नगरपालिकांना प्रत्येकी २.२५ कोटी रुपये देण्याच्या सूचना खासदार मोहिते यांनी केल्या.
बातम्या आणखी आहेत...